आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराजीनाम्यानंतर सिद्धूंची भाजपकडून दखल; सिद्धू म्हणाले, आयपीएलनंतर बोलू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पक्षावर नाराज असलेले अमृतसरचे खासदार नवज्योत सिंग सिद्धू यांच्याशी पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी फोनवरून संवाद साधला आणि नाराजी दूर करण्याचे आश्वासनही दिले. गडकरी अध्यक्ष असताना सिद्धू त्यांच्या कार्यकारिणीत सचिव पदावर होते, परंतु राजनाथ सिंह यांनी पदभार स्वीकारताच त्यांना कार्यकारिणीतून डच्चू दिला होता. ही गोष्ट सिद्धू यांना आवडली नाही. गेल्या काही दिवसांपासून पक्षाकडून आपणास जाणीवपूर्वक दुर्लक्षिले जात आहे, अशी नाराजीची भूमिका सिद्धू यांच्या पत्नीकडून जाहीरपणे मांडण्यात आली होती. त्याची भाजपच्या प्रमुखांनी तातडीने दखल घेत शुक्रवारी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अमृतसरचे खासदार असलेले सिद्धू सध्या राजधानीत आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धा होईपर्यंत ते व्यग्र असल्याचे सांगण्यात आले.
पत्नीने केला होता आरोप- नवज्योतसिंग सिद्धू यांची भाजपमध्ये मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप त्यांची पत्नी, भाजप आमदार डॉ. नवज्योत कौरने गुरुवारी केला होता. त्यामुळे माजी क्रिकेटपटू सिद्धू भाजपपासून व राजकारणातून निवृत्ती घेणार अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र भाजपने त्यांच्या नाराजीनाम्याकडे लक्ष दिल्याचे दिसून येत आहे.
वाजपेयींच्या सांगण्यावरुन लढविली होती निवडणूक- तीन वेळा खासदार राहूनही सिद्धू जर एखाद्या सहकार्‍याला चांगले पद देऊ शकत नसेल तर त्याने निवडणूक का लढवायची? असा प्रश्न नवज्योत कौरने उपस्थित केला होता. इतरांसाठी राजकारण व्यवसाय असू शकतो. सिद्धूसाठी ती सेवाभाव आहे, असेही त्याच्या पत्नीने म्हटले होते. वास्तविक सिद्धू राजकारणापासून दूर राहू इच्छित होता. मात्र, अटलबिहारी वाजपेयी यांच्या सांगण्यावरून त्याने अमृतसरहून लोकसभेची निवडणूक लढवली होती. 2009 मध्ये उत्तर भारतातील 43 लोकसभा जागांपैकी केवळ सिद्धूचीच जागा भाजपला जिंकता आली होती, असेही नवज्योत कौर यांनी सांगितले होते. अखेर त्यांची दखल पक्षाध्यक्ष राजनाथसिंग यांनी घेतली.
कारण काय? : आपले कार्यक्षेत्र सोडून सिद्ध टीव्हीवरच वेळ घालवतो, हा आरोप नवज्योत कौर यांनी फेटाळून लावला. सिद्धू यांनी 'बिग बॉस' या रिअँलिटी शोमध्येही भाग घेतला होता. सध्या तो आयपीएलच्या शोध्ये सूत्रसंचालक आहे.