आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp & Ramvilas Paswan Deal Nearabout Done, May In 2 Days Official Decleartion

भाजप- पासवान यांच्यात अखेर डील, लोकसभेच्या 7 जागांवर सहमती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 12 वर्षानंतर रामविलास पासवान यांचे एनडीएत परतणे जवळपास निश्चित झाले आहे. भाजप आणि पासवान यांचा पक्ष लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) यांच्यात लोकसभेच्या जागा लढविण्यावरून अंतर्गत समझोता झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप बिहारमध्ये पासवान यांच्या पक्षाला लोकसभेच्या 7 जागा सोडणार आहे. याचबरोबर औरंगाबादची लोकसभा जागा जेडूी (यू)चे विद्यमान खासदार सुशील सिंह यांना सोडण्याचा निर्णय झाला आहे. पासवान यांच्या पक्षाने एनडीएत जाण्याबाबत सर्व अधिकार पासवान यांना दिले आहेत. त्यानुसार येत्या दोन दिवसात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पासवान यांच्या पक्षाला हाजीपूर, वैशाली, झंझारपूर, समस्तीपूर, जमुई, मुंगेर आणि खगडिया या सात जागा सोडण्यात येणार आहेत. आरा या जागेसाठी एलजेपीने हट्ट धरला होता मात्र भाजपने ती जागा कोणत्याही स्थितीत सोडणार नसल्याचे स्पष्ट सांगितले. 7 जागा पासवान यांच्या पक्षाला सोडल्या असल्या तरी 8 वी औरंगाबादची जागा तांत्रिकदृष्ट्या पासवान यांच्या पक्षाकडेच राहणार आहे. येथून जेडीयूचे खासदार सुशील सिंह आहेत. ते भाजपमध्ये येणार आहेत. मात्र भाजपमधील एका स्थानिक बड्या नेत्याने त्यास विरोध केल्याने पासवान यांच्या पक्षाच्या तिकीटावर ते निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. मात्र ते भाजपचेच असतील.
पुढे वाचा, भाजप-पासवान यांच्या संभाव्य युतीबाबत माहिती....