आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Releases It\'s Manifesto On First Phase Of Lok Sabha Election

देशभर बुलेट ट्रेन, प्रत्येक राज्यात ‘एम्स’, 100 नवी शहरे वसवणार; विकास हेच भाजपचे लक्ष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजपने अखेर सोमवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ आणि ‘सर्वांची साथ, सर्वांचा विकास’ या घोषणा देत भाजपने एकप्रकारे स्पष्ट केले की, आता विकास हेच लक्ष्य आहे. आपले प्रमुख तीन मुद्दे मांडण्यासही भाजप विसरला नाही. राममंदिर मुद्द्यावर यू टर्न घेत ‘घटनेच्या चौकटीत राहून मंदिर उभारू,’ असे आश्वासन जाहीरनाम्यात असून शंभर नवी शहरे, बुलेट ट्रेन असे स्वप्नही यात आहे.
पीएमसोबत सीएमही : पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत बसलेली मंडळीच फक्त निर्णय घेणार नाही. मुख्यमंत्री व अन्य अधिकार्‍यांसह तयार केलेली ‘टीम इंडिया’ महत्त्वाचे निर्णय घेईल.
हा ड्रॅकुला ब्लड बँकेचा प्रमुख बनू पाहतोय
आमच्या जाहीरनाम्याची भाजपने कॉपी केली आहे. मतदानादिवशी जाहीरनामा प्रसिद्ध करणे व मंदिराच्या उल्लेखाबद्दल आयोगाकडे तक्रार केली आहे. अल्पसंख्याकांच्या कल्याणाची भाषा भाजप करतो
तेव्हा असे वाटते की, ड्रॅकुला ब्लड बँकेचा प्रमुख बनू पाहतो आहे.
- अभिषेक मनू सिंघवी, काँग्रेस
तीन मुद्द्यांवर भाजप एक पाऊल मागे
राममंदिर घटनेच्या चौकटीत राहूनच
मंदिराचा मुद्दा जाहीरनाम्यात आहे. मात्र, घटनेच्या चौकटीत राहूनच निर्णय घेण्याचे आश्वासन. मंदिर लाटेत (1991) सत्ता आली तर राममंदिर बांधण्याचे दिले होते आश्वासन. अटलबिहारी लाट व आघाडीच्या काळात (1996-98) म्हणाले, बहुमत मिळाले तर राममंदिर.
कलम 370 सर्व पक्षांशी चर्चा
सर्व पक्षांशी चर्चेनंतरच कलम 370 रद्द करण्यावर विचार. 1991 नंतर 370 वे कलम रद्द करण्याचा मुद्दा भाजपच्या अजेंड्यावर राहिला आहे.
समान नागरी कायदा आयोग गायब
समान नागरी कायद्यासाठी आयोग नेमू, असे
भाजप सांगत असे. यंदा प्रथमच जाहीरनाम्यात हा
मुद्दा नाही. केवळ मसुद्यावर ठाम राहण्याचा मुद्दा समाविष्ट करण्यात आला आहे.
काँग्रेस-भाजपच्या आश्वासनांतील फरक
आरोग्य
भाजप । प्रत्येक राज्यात ‘एम्स’ ०आरोग्याची हमी. ई-हेल्थ अथॉरिटी ०शहरे, वस्त्यांत स्वच्छतेला प्रोत्साहन.
काँग्रेस । निरोगी राहण्याचा अधिकार, आरोग्य विमा
शिक्षण-रोजगार
भाजप । शिक्षणावर जीडीपीच्या 6 % खर्च करणार. नॅशनल मल्टी स्किल मिशन.
काँग्रेस । 10 कोटी युवकांना कौशल्य विकास संधी. 2020 पर्यंत 60 लाख नोकर्‍या.
आर्थिक
भाजप । किमती स्थिर ठेवण्यासाठी विशेष निधी. व्यवस्था सुधारणार.
काँग्रेस । सत्तेत आल्यानंतर 100 दिवसांत जीडीपी 8 टक्क्यांवर नेणार.
महिला
भाजप । संसदेत 33 % आरक्षण. संपूर्ण देशात ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियान. आयटीआय आणि मोबाइल बँक उघडणार.
काँग्रेस । आरक्षण देणार. सार्वजनिक सुरक्षा, संरक्षणासाठी सिटीझन चार्टर. 1 लाखापर्यंत कर्ज. पोलिस ठाण्यात 25% महिला कर्मचारी.
अल्पसंख्याक
भाजप । मुलींना शिक्षण आणि नोकरीत
भेदभाव न करता संधी. राष्ट्रीय मदरसा आधुनिकीकरण कार्यक्रम राबवणार.
काँग्रेस । जातीय हिंसाचारविरोधी कायदा. कौशल्य विकासासाठी विशेष निधी. शैक्षणिक क्षेत्रात, सरकारी नोकर्‍यांत आरक्षण.
मोदी म्हणाले, निरपेक्ष काम करू. जनतेचाच विचार करू. स्वत:साठी काही करणार नाही.
सुषमा स्वराज म्हणाल्या, आता खूप झाले, सुवर्णकाळ येईल.
अडवाणी म्हणाले, मोदींच्या नेतृत्वाखाली होत असलेली ही निवडणूक अभूतपूर्व, आनंददायी आहे.