आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • BJP Releases Its Vision Document For Upcoming Delhi Assembly Polls

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपच्या \'व्हिजन डॉक्युमेंट\'वर नरेंद्र मोदीची छाप; नवीन काहीच नाही, कॉंग्रेसची टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) आज (मंगळवारी) 'व्हिजन डॉक्युमेंट' जाहीर केले. भाजपच्या 'व्हिजन डॉक्युमेंट'वर पंतप्रधान नरेंद्र मोदींची छाप दिसत आहे. गुड गव्हर्नन्स आणि विकासाच्या माध्यमातून दिल्‍लीला 'वर्ल्‍ड क्‍लास सिटी' बनवण्याचे आश्वासन भाजपने द‍िले आहे.

दिल्ली भाजपचे अध्यक्ष सतीश उपाध्याय आणि मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी 'व्हिजन डॉक्युमेंट' जाहीर करून मतदारांना आकर्षित करण्‍याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, भाजपाच्या 'व्हिजन डॉक्युमेंट'वर कॉंग्रेसने जोरदार टीका केली आहे. भाजपच्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये नवीन काहीच नसल्याचे दिल्ल्याच्या माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेत्या शीला दीक्ष‍ित यांनी म्हटले आहे. कॉंग्रेसच्या कार्यकाळातील कामांचे एकत्रीकरण करुन भाजपने 'व्हिजन डॉक्युमेंट' जाहीर केले असल्याची टीका दीक्षित यांनी केली आहे.
किरण बेदी यांनी सांगितले की, 'व्हिजन डॉक्युमेंट'मध्ये एकूण 270 मुद्यांवर लक्ष केंद्रीत करण्‍यात आले आहे. यात महिलांच्या सुरक्षिततेच्या मुद्यांवर जोर देण्यात आला आहे. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत भाजपने घोषणापत्र सादर केलेले नाही. त्या बदल्यात व्हिजन डॉक्युमेंट जाहीर केले आहे.
भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत कठोर कारवाई करणार असून त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे किरण बेदी यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक महिन्याला रेडिओवरून करणार 'दिल की बात' या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला जाईल. 1984 मध्ये झालेल्या दंगल पीडितांना भाजप सरकार न्याय देईल, असे आश्वासन किरण बेदी यांनी दिले.
दिल्लीकरांना स्वस्त वीज आणि सर्व घरांत 24 तास पाणी देण्यात प्राथमिकता दिली जाईल, असे दिल्ली भाजपचे अध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी सांगितले. तसेच जिथे झोपडी असेल तिथे पक्के घर देण्याचे आश्वासन व्हिजन डॉक्युमेंटच्या माध्यमातून देण्यात आले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, भाजपच्या 'व्हिजन डॉक्युमेंट'मध्ये नवीन काहीच नाही- शीला दीक्षित