आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Rift: Gadkari Backs Modi, Shah, Seeks Action For ‘irresponsible’ Remarks

RSSला नकोत अमित शहा, आता फेरनिवड अशक्यच; चाचपणी सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्ली आणि बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजप अध्यक्ष अमित शहा यांची या पदावर फेरनिवड करण्यात येऊ नये, असा ठाम निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला आहे. केंद्रात मंत्री असलेल्या एका वरिष्ठ नेत्याकडे संघाने ही भावना बोलून दाखवली.

पश्चिम बंगाल व त्यानंतर उत्तर प्रदेशच्या निवडणुका पाहता नव्या अध्यक्षपदासाठी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह किंवा नितीन गडकरी यांच्या नावाबाबत बिहारमधील पराभवानंतर पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांची केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह तसेच वित्तमंत्री अरुण जेटली यांनी पाठराखण केली होती. परंतु भाजपमधील काही नेत्यांप्रमाणेच संघही या दोन्ही नेत्यांना जाब बिवचारल्याशिवाय सोडायला तयार नाही. शहा हे पक्षनेत्यांनाही भेटत नाहीत; सल्लामसलत करीत नाहीत, त्यामुळे अनेक नेते त्यांच्यावर नाराज असल्याच्या तक्रारी संघाकडे गेल्या अाहेत. दिल्ली व बिहारमधील पराभव संघाने मनाला लावून घेतला आहे. त्यामुळे आता जानेवारीत अमित शहा यांची पक्षाध्यक्षपदी फेरनिवड करण्यास संघ अनुकूल नाही.

अध्यक्षासाठी चाचपणी
बिहार निवडणुकीची समीक्षा करावी, ही संघाची भूमिका आहे. संघाने नव्या पक्षाध्यक्षांची चाचपणी सुरू केली आहे. शहांची मुदत जानेवारीत संपत आहे. भागवतांनी गडकरींना पुन्हा पक्षाध्यक्षाबाबत विचारणा केली आहे. प. बंगाल व त्यानंतर यूपीच्या निवडणुका पाहता राजनाथ, गडकरी यांच्याविना दुसरा दमदार नेता नसल्याची भावना संघात आहे.