आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2019 निवडणुकीची BJPची तयारी, कॅबिनेटमध्येही होऊ शकतात फेरबदल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजपचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांनी उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नायडू यांच्याकडे माहिती आणि प्रसारण यासह नगरविकास सारखे महत्त्वाचे खाते होते. उपराष्ट्रपती पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या रात्री त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. कॅबिनेटमध्ये फेरबदल होण्याच्या चर्चेनेही जोर धरला आहे. याशिवाय 2018 मधील विधानसभा निवडणुका आणि त्यानंतर 2019 च्या 'फायनल'चीही तयारी भाजप आतापासून करण्याची शक्यता आहे.
 
#1 - कॅबिनेटमध्ये मोठे बदल 
- उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर केंद्रीय कॅबिनेटमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. एनडीएचे संख्याबळ पाहाता नायडू उपराष्ट्रपती होणार हे निश्चित मानले जात आहे. त्यांच्याकडे असलेले नगरविकास आणि माहिती व प्रसारण ही खाती कोणाकडे जातात याची आता चर्चा सुरु झाली आहे. मनोहर पर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडील संरक्षण खात्याचा पदभार अरुण जेटली यांच्याकडे देण्यात आला आहे. पर्यावरण मंत्री अनिल माधव दवे यांच्या निधनामुळे हे खातेही रिक्त आहे. 
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील एक गट भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महासचिव यांना संरक्षण मंत्री करण्याच्या बाजूने आहे. मात्र संघाने नरेंद्र मोदींना कॅबिनेटमध्ये कोणाला घ्यायचे आणि कोणाला नाही याचे पूर्ण अधिकार दिले आहे. अशीही चर्चा आहे की मोदी आणि शहा संरक्षण मंत्रिपदासाठी भाजप शासित एखाद्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना या पदावर घेण्याची दाट शक्यता आहे. मात्र ही कल्पना बहुतेक भाजप नेत्यांना रुचणारी नाही.  
 
#2 - पक्ष - संघटनेतही फेरबदल 
- गेल्या काही दिवसांमध्ये अमित शहा आणि संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या अनेक बैठका झाल्या आहेत. यामध्ये कॅबिनेट व संघटनेतील फेरबदलावरही चर्चा झाल्याची शक्यता आहे. सूत्रांची माहिती आहे की शहा आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यात संभावित कॅबिनेट आणि पक्षाबाबत चर्चा झाली आहे. 
 
#3 - 2018 मधील विधानसभा निवडणूका 
- येत्या वर्षात मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणूका आहेत. भाजप याचीही तयारी करत आहे. या दोन्ही राज्यांमध्ये गेल्या 14-15 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. राजस्थानही पक्षाच्या रडारवर आहे. या राज्यांमध्ये पार्टी-इन्कम्बन्सी फॅक्टर प्रभावी होणार नाही याकडे पक्षाने अधिक लक्ष दिले आहे. 
- 2018 मध्ये कर्नाटक, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम, नागालँड, मेघालय आणि त्रिपूरा या राज्यांमध्ये निवडणूक आहे. त्यादृष्टीने पक्षात बदल करण्याची भाजप नेतृत्वाला गरज वाटत आहे. 
 
#4 - 2019 मधील सार्वत्रिक निवडणूक 
- 2014 च्या लोकसभा निवडणूकीत भाजपला राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांतून भरघोस पाठिंबा मिळाला, याच जोरावर पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला होता. पक्ष कार्यालयाची जबाबदारी असलेली नवी टीम आणि प्रवक्ते 2019 च्या तयारीला लागले आहेत. कारण मोदी आणि शहा यांना 2014 चे मॅजिक पुन्हा एकदा दाखवून द्यायचे आहे. 
- निवडणूकीची पूर्वतयारी म्हणून लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना त्यांच्या मतदारसंघावर फोकस करण्यास सांगण्यात आले आहे. 
 
#5 - NDA चा गोतावळा वाढवणे 
- सूत्रांच्या माहितीनुसार, 2014 मध्ये उत्तरप्रदेश, राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेशातून जे अभूतपूर्व यश मिळाले त्याची पुनरावृत्ती 2019 मध्ये होईल याची शाश्वती पक्ष नेतृत्वाला नाही. अशावेळस याची भरपाई दुसऱ्या राज्यातून करण्याची रणनीती आखण्याची तयारी आहे. यावेळी ओडिशा, पश्चिम बंगाल, तेलंगणा या राज्यांत पाय रोवण्याची भाजपची तयारी सुरु आहे. 
- 2019 च्या तयारीसाठी भाजप एनडीएचा गोतावळा कसा वाढेल याचीही तयारी करत आहे. निवडणुकीच्या काही महिने आधी यावर फोकस केला जाण्याची शक्यता आहे. 
 
व्यंकय्या नायडू यांनी उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 
बातम्या आणखी आहेत...