आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp Spokesman Favors Nitishkumar Over Modi For Pm Candidature

राग नितीश आळवणा-या प्रवक्त्याची भाजपकडून हकालपट्टी, \'शॉटगन\'चे काय?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- बिहारचे मुख्‍यमंत्री नितीशकुमार यांचे गुणगान करणारे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते रामकिशोर सिंह यांच्‍यावर कारवाई करण्‍यात आली आहे. पक्षाने त्‍यांची प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी केली असून पक्षातूनही का काढू नये, असा सवाल केला आहे. रामकिशोर सिंह यांच्‍यावर पक्षाने कारवाई केली. परंतु, पक्षाचे ज्‍येष्‍ठ नेते शत्रुघ्‍न सिन्‍हा यांनीही मोदीविरोधी राग आळवला आहे. त्‍यांनीही नितीशकुमार हेच पंतप्रधानपदाचे योग्‍य असल्‍याचे म्‍हटले आहे. सिन्‍हा यांनी यापूर्वी नरेंद्र मोदींच्‍या टीमवर टीका केली होती. मोदींच्‍या टीममध्‍ये सहभागी न केल्‍यामुळे नाराजी व्‍यक्त केली होती. या टीमला त्‍यांनी 'लॉलीपॉप' म्‍हटले होते.

भाजपने रामकिशोर सिंह यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सिंह यांनी दोन दिवसांपूर्वीच मोदींच्‍या गुजरात विकास मॉडेलवर टीका केली होती. हे मॉडेल देशासाठी उपयुक्त ठरु शकणार नाही, असे ते म्‍हणाले होते.

काय म्‍हणाले होते रामकिशोर सिंह? वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये...