आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • BJP Spreading Half truths, Canard Via Social Media: Cong

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोशल मीडियात भाजपचे भाडोत्री लोक, काँग्रेसचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वृत्तसंस्था /नवी दिल्ली- जनतेमध्ये अर्धसत्य पसरवण्यासाठी भाजपने सोशल मीडियामध्ये भाडोत्री व्यावसायिकांची नेमणूक केली आहे. हीच मंडळी अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी पेरण्याचे काम करू लागली आहे, असा आरोप काँग्रेसकडून गुरुवारी करण्यात आला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रवक्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी काँग्रेसकडून गुरुवारी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

काँग्रेसचे खासदार दीपिंदर हुडा यांच्याकडे राष्ट्रीय डिजिटल मीडिया सेल प्रमुखपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. भाजप विशेषत: नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियामध्ये व्यावसायिक तज्ज्ञांची नेमणूक केली आहे. भाजपने भाडोत्री लोकांच्या मदतीने नको ते उद्योग सुरू केले आहेत. परंतु आम्ही पक्षाची भूमिका मांडण्यासाठी स्वयंप्रेरणेतून सोशल मीडियाचा वापर करणार आहोत, असा दावा दीपिंदर हुडा यांनी केला. कार्यशाळेला पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, सरचिटणीस राहुल गांधी यांची अनुपस्थिती जाणवली.


कार्यशाळा नेमकी कशासाठी? भाजपचा मुकाबला करण्यासाठी पक्ष प्रवक्त्यांना ट्विटर, फेसबुक व इतर सोशल नेटवर्किंगची माहिती कार्यशाळेत दिली. विरोधकांच्या आरोपावर भूमिका मांडण्यासाठी मायक्रोब्लॉगिंगचा वापर करण्याचे कौशल्य प्रवक्त्यांकडे असावे, असे काँग्रेसला वाटते.

प्रत्येक राज्यात संवाद केंद्र
काँग्रेसने निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यासाठी संवाद साधनांच्या वापराचा आराखडा तयार करण्यात आला आहे. देशातील प्रत्येक राज्यात अशा प्रकारचे संवाद केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. त्याचे तीन भागात विभाजन करण्यात आले आहे. सोशल मीडिया, संशोधन व प्रवक्ता पद असे तीन भाग असतील, अशी माहिती खासदार प्रिया दत्त यांनी दिली.