आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींची राजीनाम्याची धमकी? CMO ला अर्वाच्च शिविगाळ करणारे भाजप आमदार निलंबित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवारातील संघटनांचे नेते यांच्याकडून होत असलेल्या वादग्रस्त वक्तव्याने केंद्र सरकारला माफी मागण्याची वेळ येत आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज असून त्यांनी राजीनामा देण्याची धमकी दिली आहे. या वृत्ताने संघामध्ये खळबळ उडाली असल्याची चर्चा आहे. पंतप्रधानांच्या निर्देशानंतरच राजस्थानमधील भाजप आमदार प्रल्हाद गुंजल यांना पक्षाने निलंबित केले असल्याचे बोलले जात आहे.
हिंदूत्व आणि धर्मांतराच्या मुद्यावरुन गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारची किरकिरी सुरु आहे. या मुद्यांवर संघ आणि संघाशी संबंधीत संघटनांचे नेते वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. याशिवाय भाजप नेते आणि खासदारांमध्येही वादग्रस्त भूमिका घेण्याची जणू स्पर्धा सुरु आहे. धर्मांतराच्या मुद्यावरुन राज्यसभेचे कामकाज खोळंबले आहे. यामुळे मोदींनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर संघाने या नेत्यांविरोधात कठोर भूमिका घेण्यास परवानगी दिली आहे. त्याचाच परिणाम म्हणून प्रल्हाद गुंजाळ यांचे निलंबन असल्याचे बोलले जात आहे.