आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघटित गुन्हेगारांचे पुढील लक्ष्य गरीब मुसलमान; भाजपच्या पथकाची टिप्पणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ/कैराना- उत्तर प्रदेशमधील कैराना येथील हिंदूंच्या पलायन प्रकरणात भाजपच्या चौकशी पथकाने बुधवारी खुली सुनावणी केली. पथकाने म्हटले आहे की, ‘कैरानातील पलायनामागे संघटित गुन्हेगारी संघटना आहे. त्यामुळे देशाच्या या भागात घटनेचे नव्हे तर मुकीम काला आणि फुरकान यांच्यासारख्या गुंड-माफियांचे समानांतर सरकार काम करत आहे. त्यांना सपाच्या स्थानिक नेत्यांचे संरक्षण आहे. मुकीम काला तुरुंगात असून तेथून आपले साम्राज्य चालवत आहे.
तक्रार केल्यास पोलिस ‘अॅडजस्ट करा,’ असा सल्ला देत आहे. हे चौकशी पथक आपला अहवाल पक्षाध्यक्षांना देणार आहे.

बुधवारी येथे आलेल्या सदस्यांच्या चौकशी पथकाने म्हटले आहे की, ‘सध्या हिंदू व्यापाऱ्यांना पळवून लावले जात आहे. त्यांचे पुढील लक्ष्य ग्रामीण भागातील गरीब मुस्लिम कुटुंबं असेल. गुंडांची त्यांच्या संपत्तीवरही नजर आहे.’ भाजपच्या या चौकशी पथकाला सांगण्यात आले की, खंडणी, धमकी आणि कब्जा अशा तक्रारी केल्यास पोलिस ‘अॅडजस्ट करा’ असा सल्ला देत आहेत. पश्चिम उत्तर प्रदेशच्या हरियाणाला लागून असलेल्या कैरानात हिंदूंच्या पलायनाचा तपास करण्यासाठी आलेल्या भाजपच्या पथकाचे नेतृत्व सुरेश खन्ना करत आहेत.

गुंडांना संरक्षण दिल्याने ही परिस्थिती
माजी पोलिस महासंचलाक बृजलाल यांनी म्हटले आहे की, हे कायदा-सुव्यवस्थेचे अपयश आहे. गुंडांना सत्तेचे संरक्षण मिळाल्यावर अशी स्थिती उद््भवते. शिपायाची हत्या आणि कार्बाइन लुटण्याच्या प्रकरणात मुकीम कालाची शरणागती सपाच्या नेत्यांनीच केली होती. येथे लोक दहशतीत जगत आहेत. पूर्ण परिसर खंडणी, गुंडगिरी, कब्जा आणि प्रताडना यामुळे पीडित आहे. मुकीम सध्या महाराजगंज तुरुंगात आहे. तेथून तो टोळीचे संचालन करत आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...