आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक आयोगाची केजरीवाल यांना नोटीस, भाजपने ठरवले I-Run Man

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी
नवी दिल्ली - काँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवली आहे. काँग्रेसने केजरीवाल यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप लावला होता.
सगळ्यांकडून पैसे घ्या पण मत आपला द्या असे आव्हान केजरीवालांनी सभेमध्ये मतदारांना केले होते. त्यासंदर्भात ही तक्रार करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने केजरीवाल यांना उत्तर देण्यासाठी 22 जानेवारी सायंकाळी चार वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे.
भाजपने म्हटले I-Run Man
केजरीवाल यांनी किरण बेदी यांनी खुल्या चर्चेसाठी आव्हान दिले आहे. तसेच बेदी यांनी ट्वीटरवर आपल्याला अनब्लॉक करावे असेही केजरीवाल म्हणाले होते. त्यावर भाजप प्रवक्ते संबित पात्रा मंगळवारी म्हणाले की, 'आम आदमी पक्षाने आता एक नवा 'ट्वीटर ट्वीटर' खेळ सुरू केला आहे. बेदी यांनी त्यांना दीड वर्षांपूर्वी ब्लॉक केले होते, हे सत्य मात्र ते सांगत नाहीत. केजरीवालांनी अराजकतावादी राजकारण सुरू केले तेव्हा त्यांनी हा निर्णय घेतला असे भाजपने स्पष्ट केले. तसेच यावेळी किरण बेदींना Iron Woman तर केजरीवाल यांना I-Run Man असेही संबोधले.
आप म्हणजे, ऑल अबाऊट पब्लिसिटी
पात्रा म्हणाले की, ''आप चा अर्थ 3डी आहे. म्हणजे ड्रामा, धरणे आणि डिबेट. भाजपचाही 3डी वर विश्वास आहे पण त्याचा अर्थ डेवलपमेंट, डेमोक्रेसी आणि डिलिव्हरी अशा होता. आपचा अर्थ आम आदमी पार्टी नव्हे तर ऑल अबाऊट पब्लिसिटी (सर्वकाही प्रसिद्धीसाठी) असा होतो, असेही ते म्हणाले.
आपचा हल्ला
आप प्रवक्ते आतिशी मरलेना म्हणाले की, किरण बेदी कालपर्यंत चर्चेसाठी तयार होत्या. आता त्या मागे हटल्या आहेत. म्हणजे भाजप घाबरले आहे का? बेदी वीज आणि महिलांच्या मुद्यावर आपली भूमिका स्पष्टपणे का मांडत नाही, असे ते म्हणाले. बेदींनाही त्यांच्या पक्षाप्रमाणे महिलांनी चार मुलांना जन्म द्यावा, असेच वाटते का? असा सवाल मरलेना म्हणाले आहेत. तर भाजप नेते विनोद बिन्नी यांनी आपण केजरीवाल यांना 25 वेळा चर्चेचे आव्हान दिले तेव्हा त्यांनी ते का स्वीकारले नाही असा सवाल उपस्थित केला आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, किरण बेदींच्या जुन्या ट्वीट्सवर सोशल मिडियामध्ये होणार हल्ला