आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजनाथ, स्वराज, जेटली बालंबाल बचावले; भाजप नेत्यांच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ज्येष्ठ भाजप नेते प्रवास करत असलेल्या विमानाचे सोमवारी आपत्कालीन लँडिंग करणे भाग पडले. सकाळी 9 वाजता उड्डाण घेतल्यानंतर विमानाला नऊ मिनिटांत उतरावे लागले. यामध्ये भाजप अध्यक्ष राजनाथसिंह, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली होते. बंगळुरूतील प्रचारसभेसाठी ते जात होते. हवाई वाहतूक नियंत्रक (एटीसी) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाच्या वैमानिकाला ऑटोपायलट यंत्रणेत बिघाड झाल्याचे संकेत मिळाले होते. त्यानंतर त्याने परवानगी मागून तत्काळ विमान उतरवले. विमानात भाजपचे सरचिटणीस धर्मेंद्र प्रधान आणि सहसचिव (संघटन) व्ही. सतीश होते.

दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होणार असल्याचे जाहीर करून भाजपने सोमवारी याबाबतच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

काँग्रेसची रणनीती
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करून निवडणूक प्रचार मोहीम राबवणे ही आमची रणनीती नाही, असे कॉँग्रेसने स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर न करणे हीच आमची रणनीती आहे. आमचे संयुक्त नेतृत्व असून प्रत्येक जण निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत आहे, असे कर्नाटक प्रदेश कॉँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जी. परमेश्वर यांनी सांगितले. भाजपने विद्यमान मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांचे नाव याआधी जाहीर केले आहे. त्यामुळे काँग्रेसवर मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबत दबाव आहे.