आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजनाथपुत्रावर लाचेचा आरोप, भाजप - मोदी सरकारचे डॅमेज कंट्रोल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ‘न खाऊंगा न खाने दूंगा’ अशी द्वाही देत सत्तारूढ झालेले मोदी सरकार देशापुढे १०० दिवसांच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडण्याची तयारी करत असतानाच केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या मुलानेच पैसे घेतल्याचा आरोप झाल्याने स्पष्टीकरण देताना सरकारपासून भाजपपर्यंत सर्वांच्याच नाकी नऊ आले आहेत.

राजनाथसिंहांचा मुलगा पंकजच्या गैरव्यवहाराच्या आरोपाने मोदी सरकार व भाजप अडचणीत आले. त्यामुळे या आरोपांबाबत स्वत: राजनाथ यांनी स्पष्टीकरण दिले. त्यांनी मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेऊन राजीनाम्याची धमकी दिल्याचेही सांगितले जाते. या आरोपामागे सरकारमधीलच एका प्रतिस्पर्धी मंत्र्याचा हात असल्याचे राजनाथांना वाटते. दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभेच्या ११ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. भाजपने मंगळवारी याची उमेदवारी यादी जाहीर केली होती. यामध्ये राजनाथ सिंह यांचे पूत्र पंकज सिंह यांना स्थान मिळण्याची आशा होती. राजनाथ यांच्यासाठी लखनऊ मतदारसंघ सोडणारे लालजी टंडन यांचे पूत्र गोपाल यांना लखनऊ पूर्वची उमेदवारी जाहीर झाली. यानंतर राजनाथ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
अफवांचे पीक
१. उत्तर प्रदेश भाजपचा सरचिटणीस पंकजने बदलीसाठी पोलिस अधिकाऱ्यांकडून पैसे घेतले.
२. पंकजसिंहने एका उद्योजकाकडून पैसे घेतले आणि रक्कम मिळाल्यानंतर काम करून दिले.
३. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजनाथ आणि पंकज यांना बोलावून घेतले. पंकजची खरडपट्टी काढली आणि पैसे परत देण्यास सांगितले.