आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • BJP Unveils 270 point Vision Document; Promises To Make Delhi A 'world class Smart City'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्लीला जागतिक दर्जाचे शहर बनवणार : भाजप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या चार दिवस आधी भाजपने मंगळवारी व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध केले. यामध्ये दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा उल्लेख नाही. मात्र, राष्ट्रीय राजधानीस जागतिक दर्जाचे शहर बनवणे आणि विकासावर विशेष लक्ष देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

व्हिजन डॉक्युमेंटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छाप स्पष्टपणे दिसते. यामध्ये सुरक्षेसह ३५ मुद्द्यांवर केंद्रित २७० बिंदू समाविष्ट करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री अनंतकुमार, हर्षवर्धन आणि निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत दिल्ली भाजपचे अध्यक्ष सतीश उपाध्याय आणि मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध केले.

मुख्य मुद्दे :
१. झोपडपट्टीच्या ठिकाणीच घर बांधून देणार, २.मध्यमवर्गीयांसाठी एक लाखे घरे बांधणार ३. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "मन की बात' कार्यक्रमाच्या धर्तीवर दर महिन्यास मुख्यमंत्री "दिल की बात' करणार ४. मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांशी संपर्कासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा ५. दर पाच किमी अंतरावर १५ खाटांचे रुग्णालय तसेच रुग्णवाहिकेची व्यवस्था. ६. सरकारी रुग्णालयात सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत खासगी ओपीडी सुविधा. ७. ईशान्येतील लोकांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक ठाण्यात शाखा. २४ तास हेल्पलाइन. ८. बेकायदा वसाहती अधिकृत करणार. वसाहतींच्या ले-आऊटचा निधी दिल्ली सरकार देईल. ९. पाणीपट्टीचा आढावा. १०. दिल्लीला पर्यटन आणि मेडिकल टुरिझमचे केंद्र बनवणार. व्यवसायाला अनुकूल वातावरण निर्माण होईल.

मात्र, हे मुद्दे वगळले
१. दिल्लीला पूर्ण राज्य बनवण्याचा मुद्दा. यावर पक्षाचे मत सांगण्यात आले नाही. आपल्या जाहीरनाम्यात २०१३ मध्ये विधानसभा निवडणूक आणि त्याआधीच्या निवडणुकांमध्ये पक्षाने याचे आश्वासन दिले होते.
२. वीजदरात कपात करण्याचे म्हटले आहे. त्याआधी २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत दरात ३० टक्के कपात करणार असल्याचे म्हटले होते.