आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीर मध्ये मिशन 44+: पहिला हिंदु सीएम बनवण्यासाठी भाजपचे प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय जनता पार्टी (बीजेपी)ने जम्मू काश्मीरवरही लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी उत्तर प्रदेशातील दोन दिवसीय मेळावा सोडून जम्मू-काश्मीर दौरा केला. यावरून या राज्याला भाजप किती महत्त्व देत आहे, याचा अंदाज लावता येईल.

भाजपचे मिशन 44
भाजपने यंदा होण-या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यात विजय मिळवण्याची स्वप्ने रंगवण्यास सुरुवात केली आहे. काही महिन्यांपूर्वी भाजपने विजयाचा विचारही केला नव्हता. मात्र आता 87 जागांच्या या विधानसभेमध्ये सत्तेसाठी आवश्यक असणा-या किमान 44 जागांवर विजय मिळवण्याची योजना भाजपने आखली आहे. त्याला पक्षाने 'मिशन 44' असे नाव दिले आहे.
राज्यात सर्वात मोठा पक्ष
लोकसभा निवडणुकांचा विचार करता जम्मू-काश्मीर मध्ये भाजपने 6 पैकी 3 जागा मिळवल्या आहेत. 32.4 टक्के मते मिळवत भाजप याठिकाणी सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. भाजपला एकूण 10.15 लाख मते मिळाली. भाजपच्या तुलनेत काँग्रेसला 22.9 टक्के म्हणजे 8.15 लाख, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) ला 20.5 टक्के म्हणजे 7.3 लाख तर नॅशनल कॉन्फ्रंसला 11.1 टक्के म्हणझे 4 लाख मते मिळाली. त्यामुळेच भाजपच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
त्यामुळे भाजपचे मनोधैर्यही वाढले आहे. भाजपला जम्मू आणि लद्दाखमध्ये पूर्वीपासूनच यश मिळत आले आहे. पण विधानसभा काबीज करण्यासाठी भाजप रणनीती आखण्यात व्यस्त आहे. त्यामुळे विकासाच्या अजेंड्याबरोबरच पक्ष दबक्या आवाजात भाजपचे सरकार आणि हिंदु मुख्यमंत्री बनवण्याची चर्चाही करत आहे.

भाजपची तयारी आणि रणनीती वाचा पुढील स्लाइड्सवर