आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींना नेते मानण्यास शिवराजसिंह चौहानांचा नकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसकडून राहूल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार सांगितले जात आहे, तर भारतीय जनता पक्षाने त्याआधीच नरेंद्र मोदींना या पदासाठी पुढे केले आहे. तसेच भाजपने त्यांना प्रचार प्रमुखपदी नेमून सर्व मोकळीक दिली आहे. तर, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काढलेल्या जनआशीर्वाद यात्रेवेळी लावण्यात आलेल्या पोस्टरवरुन मोदींचा चेहरा गायब झाल्याने पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे. लालकृष्ण अडवाणी हेच भाजपचे सर्वोच्च नेते असल्याचे चौहान यांनी म्हटल्याने या वादात ठिणगी पडली आहे. मध्यप्रदेश भाजप कार्यालयाच्या वतीने लावण्यात आलेल्या या पोस्टरवर मोदी समर्थक सर्वच नेत्यांना वगळण्यात आलेले आहे.

मोदींची प्रचारप्रमुखपदी नेमणूक करण्याआधी अडवाणींनी मोदींपेक्षे चौहान कर्तबगार मुख्यमंत्री असल्याचे म्हटले होते. त्यामुळेही मोदी बनाम चौहान वाद उफाळून आला होता. मात्र, तेव्हा चौहान यांनी मी पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत नाही. मी क्रमांक तीनचा मुख्यमंत्री आहे, असे सांगत या वादावर पडदा टाकला होता. मात्र, समोवारी झालेल्या आशीर्वाद यात्रेतील पोस्टरबाजीने भाजपांतर्गत खदखद बाहेर आली आहे.