आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Will Seek Forgiveness From Muslims: Rajnath Singh News In Marathi

काही चुकले असेल, तर मुस्लिमांची माफी; राजनाथसिंह यांची भूमिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मुस्लिम मतांसाठी काहीही करण्याची तयारी आता भाजपने केली आहे. ‘पक्षाच्या हातून कधी, काही चुका झाल्या असतील, तर त्यासाठी माफी मागू. यात आम्हाला कमीपणा नाही,’ अशा शब्दांत भाजपाध्यक्ष राजनाथसिंह यांनी मुस्लिमांसमोर बोलताना भूमिका मांडली.

‘मोदी फॉर मिशन 272मध्ये मुस्लिमांची भूमिका’ या कार्यक्रमात राजनाथ म्हणाले, भाजप कधीही मुस्लिमांच्या विरोधात नव्हता. आजवर सर्वांना वारंवार मुस्लिमांनी संधी दिली. आता एक वेळ आम्हालाही संधी द्या. आश्वासने पाळण्यात अपयशी ठरलो तर पुन्हा आमच्याकडे पाहू नका.