आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजप 2014 पेक्षा अधिक जागा जिंकेल: अमित शहा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजप २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २०१४ पेक्षाही जास्त जागा जिंकेल असा विश्वास पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला. २०१४ मध्ये  २८२ जागा जिंकल्या होत्या. आता प. बंगाल, केरळ, तेलंगण व ओडिशात यश मिळवून उद्दिष्ट गाठले जाईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
 
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वाखाली देश विविध क्षेत्रांत महान राष्ट्राच्या रूपात पुढे येईल, असे सांगून मोदी सरकारच्या ३ वर्षांच्या कार्यकाळात देशाचा आत्मविश्वास वाढल्याचे ते म्हणाले. २०१९ मध्ये कुणाचे आव्हान असेल? या प्रश्नावर शहा म्हणाले, निवडणुकीस आणखी २ वर्षे आहेत. त्या वेळी कोणताही पक्ष धोक्याचा ठरू शकतो. मात्र, आमच्या जागा वाढतील. भारत जगात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. मुद्रा बँकेने ७.५ कोटी युवांना कर्ज दिले आहे. ४.५ कोटी गरिबांच्या घरात शौचालये बांधण्यात आली आहेत.

राजकारणात गुणात्मक बदल
शहा म्हणाले, सरकारने राजकारणात गुणात्मक बदल केला आहे. राजकारणात घराणेशाही,जातीयवाद व तुष्टीकरण आज संपुष्टात आले आहे.

विरोधक आम्हास भ्रष्ट ठरवत नाहीत
शहा म्हणाले, २०१४ मध्ये एनडीएची सत्ता येण्याआधी १० वर्षे महिन्याला घोटाळा होता. या ३ वर्षांत विरोधकांनीही भ्रष्टाचाराचा आरोप केलेला नाही.
बातम्या आणखी आहेत...