आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp Women Leader Getting Good Position Their Husbands Still Maintain Low Key

किरण बेदी यांचे पती दाबायचे पाय; करत होते बूट पॉलिश आणि स्वयंपाकही!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशाच्या पहिल्या माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. किरण बेदी या 'पॅराशूट उमेदवार' असल्याची टीका 'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. याशिवाय किरण बेदी यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी चर्चेत आल्या आहेत.
पंजाबमधील एका मासिकाने 2013 मध्ये प्रसिद्ध केलेल्या एका मुलाखतीत किरण बेदी आणि बृज बेदी यांच्यातील पत‍ी-पत्नीच्या नात्यातील अनेक गोष्टीवर प्रकाश टाकला होता. किरण बेदी थकून घरी येत असत तेव्हा बृज बेदी हे त्यांचे पाय दाबायचे. एवढेच नव्हेतर त्याचे बुट पॉलिस करुन द्यायचे, असे या मुलाखतीत म्हटले आहे..

'एखाद्या महिलेने (किरण) कितीही कतृत्त्व मिळवले तरी ती स्वयपांक घरातील कौशल्य कधीच गमावत नाही. मात्र, मला याची कल्पना आधीची आली असती तर मी अशा महिलेशी विवाह केलाच नसता', असे एका प्रश्नाला उत्तर देताना बृज बेदी यांनी म्हटले होते.

'जिथे प्रेम असते, तिथे अहंकार नसतो'. किरण यांचे बुट पॉलिश करण्यापासून त्यांच्यासाठी स्वयंपाक करणे. एवढेच नव्हे तर किरण यांना थकून घरी यायच्या तर बृज त्यांचे पाय दाबायचे. यात प्रेमाची भावना होती. प्रेमाने केलेली कोणतीच गोष्ट चुकीची नसते, असेही बृज म्हणाले होते.

किरण बेदी यांची पोस्टिंग कायम बाहेर असेल, हे सुरुवातीलाच ठरले होते. मी तशी मानसिक तयारीही केली होती. म्हणून 'व्हिजिटिंग हसबंड' बनून राहिलो, असेही बृज यांनी सां‍गितले होते.

दरम्यान, किरण बेदी आणि त्यांचे पती बृज बेदी विभक्त राहातात. बृज हे अमृतसर येथे तर किरण बेदी या दिल्लीत राहातात. बृज हे किरण यांच्यापेक्षा जवळपास 10 वर्षांनी मोठे आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, पत्नीसाठी प्रचार करणार बृज बेदी...