आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्रात महिलांना योग्य प्रतिनिधित्व देणार- विजया रहाटकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजपमहिलांचा नेहमीच सन्मान करीत आली असून उत्तर प्रदेशात लोकसभेसाठी १३ महिलांना तिकिटे दिली होती. त्यातील १२ महिला िवजयी झाल्या. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतही महिलांना योग्य प्रतिनिधित्व मिळणार असल्याची माहिती भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी "दिव्य मराठी'सोबत बोलताना िदली.
भाजप महिला मोर्चा राष्ट्रीय अध्यक्षाचा पदभार स्वीकारल्यानंतर रहाटकर यांनी महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीर येथील निवडणुकांच्या प्रचाराची महत्त्वाची जबाबदारी महिला मोर्चा सांभाळणार असल्याचे सांगितले. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी रोजगाराभिमुख प्रकल्प राबवण्याच्या योजना आखल्या जात आहेत. महिलांची सुरक्षा, सन्मान या बाबी दृष्टिक्षेपात ठेवून देशभरात आदर्श गावांची निर्मिती करण्याचा संकल्प आहे. महिला सुरक्षेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राथमिकता दिलेली आहे. भाजप महिला मोर्चा तालुका पातळीवर महिलांच्या कार्यशाळा घेणार आहत. महिलांच्या आरोग्याचा प्रश्नावरही काम करण्याचे नियोजन आहे. कुटिरोद्योगाचे देशभर जाळे विणण्यावरही महिला मोर्चा काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. महिला कार्यकर्त्या प्रत्येक घरात पोहोचणार
भाजपच्या कार्यकर्त्या निवडणूक असणाऱ्या राज्यातील प्रत्येक घरी पोहोचणार आहेत. त्यासाठी बूथनिर्मिती करण्यात आली आहे. महाराष्ट्रात जवळपास २० विधानसभा मतदारसंघांत महिलांचे संमेलन पार पडले आहे, तर सप्टेंबरमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच्या कार्यकर्त्यांनी पिंजून काढल्याचे चित्र दिसून येईल, असे रहाटकर यांनी स्पष्ट केले.