आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp Won West Bengal Assembly Seat Where 63 Percent Population Are Muslims

बडोद्यात मतदान घटले, UP त ध्रुवीकरण फसले; जाणून घ्या पराभवाची \'नऊ\'लाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील नऊ राज्यांमधील 33 विधानसभा आणि तीन लोकसभेचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. लोकसभा निवडणूकीत चमत्कारिक बहूमत मिळवून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सत्ता स्थापन केली. मात्र, मोदींच्या लोकप्रियतेची परीक्षा ठरलेल्या या पोटनिवडणूकीत भाजपला झटका बसला आहे. ज्या उत्तर प्रदेशाने त्यांना व त्यांच्या सहकारी पक्षाच्या सहकार्याने 80 पैकी 73 जागांवर विजय मिळवून दिला होता तिथे पोट निवडणूकीत 11 पैकी फक्त 3 जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे या 11 ही जागा आधी भाजपकडे होत्या. यातील एक जागा तर पंतप्रधान मोदींच्या वाराणसी मतदारसंघातील होती. तिथेही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
राजस्थान आणि गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. तिथेही त्यांची हीच परिस्थिती झाली आहे. या दोन्ही राज्यात काँग्रेसने त्यांच्या दबदब्याला आव्हान देत त्यांच्या काही जागांवर ताबा मिळविला आहे. या पोटनिवडणुकीत पश्चिम बंगाल या तृणमूल शासीत राज्यातील एका मतदारसंघाने दिलेल्या कौलामुळे 'कमळ' खुलले आहे. जाणून घेऊ या पोटनिवडणूक निकालाची नवलाई .
1 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ वाराणसीमध्ये येणार्‍या रोहनिया विधानसभेची जागा भाजपला राखता आली नाही. येथे त्यांचा सहकारी पक्ष अपना दलचे कृष्ण पटेल यांचा समाजवादी पक्षाच्या महेंद्र पटेल यांनी 14 हजार मतांनी पराभव केला आहे.

2 - पश्चिम बंगालच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणूकीत एका जागेवर भाजप विजयी झाली आहे. बसीरहाट येथील विजयामुळे भाजपला 15 वर्षांनंतर पश्चिम बंगालमध्ये खाते उघडण्याची संधी मिळाली आहे. 1999 मध्ये बादल भट्टाचार्य यांनी भाजप-तृणमुल युतीचे उमेदवार म्हणून अशोकनगर विधानसभेच्या जागेवर विजय मिळविला होता.
3 - पश्चिम बंगालमध्ये बसीरहाट विधानसभेत भाजप विजयी झाली आहे. हा मतदारसंघ बांगलादेशाला लागून असलेल्या सीमेवर आहे. येथे जवळपास 63 टक्के मुस्लिम मतदार आहेत. राजकीय विश्लेषकांचे मत आहे, की शारदा घोटाळ्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या सरकारची प्रतिमा मलिन झाली होती आणि पशु तस्करीमुळे मतांच्या ध्रुवीकरणाचा येथे भाजपला फायदा झाला.
4- उत्तर प्रदेशमध्ये जातीय आधारावर मतांच्या ध्रुवीकरणाचा भाजपला फायदा तर झाला नाही उलट तोटा झाला आहे. ज्या मतदारसंघात भाजपचे प्रचारप्रमुख योगी आदित्यनाथ यांनी ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला तिथे भाजपला पराभवाचा सामना करावा लागला.
5 - मुरादाबादमधील ठाकुरद्वार मतदारसंघात काही दिवसांपूर्वीच धर्मस्थळांवरील लाउडस्पिकरवरुन दोन धर्मीयांमध्ये वाद झाला होता. येथे भाजप तोंडघशी पडली आहे. समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचा येथे तब्बल 1 लाख 20 हजार मतांनी विजय झाला आहे.

6 - उत्तर प्रदेशातील सहारनपूर् येथे काही दिवसांपूर्वीच धार्मिक दंगल उसळली होती. येथे भाजप उमेदवार विजयी झाला असला तरी, समाजवादी पक्षाच्या मतांची टक्केवारी येथे वाढली आहे. 2012 मध्ये सपाचा उमेदवार येथे चौथ्या क्रमांकावर होता. यावेळी त्यांच्या मतात वाढ होऊन दुसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे.

7 - गुजरातमधील बडोदा लोकसभा मतदारसंघ पंतप्रधान मोदींनी सोडल्यानंतर येथे झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराने 3.29 लाख मतांनी विजय मिळविला आहे. मात्र, मोदींच्या तुलनेत हा विजय फिका आहे. कारण मोदींनी याच जागेवर 5 लाख 70 हजार मताधिक्याने विजय मिळविला होता.
8 - समाजवादी पक्षाचे सुप्रीमो मुलायमसिंह यादाव यांनी आझमगड मतदारसंघ कायम ठेवत मैनपुरीचा राजीनामा दिल्यामुळे येथे लोकसभेची पोटनिवडणूक झाली. येथे मुलायमसिंह यांचा नातू 27 वर्षीय तेजप्रतापसिंह यादव विजयी झाला आहे. तेजप्रताप हा यादवाच्या कुटुंबातील तिसर्‍या पिढीचे प्रतिनिधीत्व करतो. तो प्रथमच खासदार झाला आहे, तर यादवांच्या कुटुंबातील सातवा संसद सदस्य आहे. एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांचे पाच सदस्य एकाचवेळी लोकसभेत असण्याची ही पहिली वेळ आहे. आजोबा मुलायमसिंह यादव, त्यांचे दोन पुतणे अक्षय आणि धर्मेंद्र, सून डिंपल अखिलेश यादव आणि आता नातू तेजप्रताप लोकसभेत एकत्र बसलेले दिसणार आहेत.
9 - राजस्थानमधील पोटनिवडणुकीत भाजपसाठी आश्चर्यकारक परिणाम समोर आले आहेत. येथे पक्षाची सत्ता असताना भाजपने तीन जागा गमावल्या आहेत. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी दोन वेळा प्रचार रॅली केल्यानंतरही नसीराबादची जागा त्यांच्या हातून 386 मतांनी गेली आहे.

पुढील स्लाइडमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये सपा तर राजस्थानमध्ये काँग्रेसचा जल्लोष...