आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्षातील पाच पॉझिटिव्ह अनुभव शेअर करा; \'मन की बात\'मध्‍ये नरेंद्र मोदींचे आवाहन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ कार्यक्रमात पॉिझटिव्ह इंडियासाठी सामूहिक प्रयत्नांचे आवाहन केले आहे.२०१८ मध्ये सकारात्मक विचारांसह प्रवेश करण्यासाठी व इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांनी लोकांना ५ चांगले अनुभव #पॉझिटिव्हइंडिया या हॅशटॅगसह शेअर करण्यास सांगितले आहे. निवडक अनुभव पुढील ‘मन की बात’मध्ये सांगितले जातील. त्यांनी मुंबई अतिरेकी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. गुजरात निवडणुकीबाबत एकही शब्द त्यांनी उच्चारला नाही.  यावेळी ते म्‍हणाले, 'आज 9 वर्षांपूर्वी मुंबईवर दहशतवादी हल्‍ला झाला होता. दहशतवादाविरोधात सर्व मानवतावादी शक्‍तींनी एकजुट दाखवली पाहिजे.' गुजरातमध्‍ये अमित शाह आणि स्‍मृती इराणीसह अनेक भाजप कार्यकर्त्‍यांनी बुथलेव्‍हलवर पंतप्रधानांची मन की बात ऐकण्‍यासाठी कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

 

26 नोव्‍हेंबरपासून गुजरात निवडणुकीच्‍या प्रचाराला भाजप सुरुवात करणार आहे. येथील 50 हजार पोलिंग बुथसाठी भाजपने नवी स्‍ट्रॅटजी तयार केली आहे. यासाठी स्‍लोग्‍न देण्‍यात आले आहे- 'मन की बात, चाय के साथ.' 9 आणि 14 डिसेंबररोजी गुजरामध्‍ये निवडणूक होणार असून 18 डिसेंबरला निकाल लागणार आहे.


'मन की बात'मधील 5 महत्‍त्‍वाचे मुद्दे

> #पॉझिटिव्हइंडिया सोबत फोटो, कथा, व्हिडिओ शेअर करता येतील. आपल्याला २०१८ चे स्वागत सकारात्मक विचारांनी करायचे आहे.

> बुजुर्ग म्हणतात, दु:ख विसरा व सुखाचा विसर पडू देऊ नका. आम्हाला याच गोष्टी मनावर बिंबवायच्या अाहेत.
> संविधान हा लोकशाहीचा आत्मा आहे. याच भावनेने न्यू इंडियाची उभारणी करा.

 

1. लहानमुलांनाही देशातील समस्‍यांची माहिती आहे
- यावेळी मोदी म्‍हणाले, 'मला हे जाणुन आनंद झाला की, देशातील लहान मुलांनाही देशाच्‍या समस्‍यांबद्दल माहिती आहे. काही दिवसांपूर्वी मला कर्नाटकमध्‍ये बालमित्रांशी गप्‍पा करण्‍याची संधी मिळाली होती. तेव्‍हा एका दैनिकाने त्‍यांना मंत्र्यांना पत्र लिहिण्‍याचे सांगितले होते. मुलांचे हे पत्र दैनिकाने छापलेही होते. ते पत्र मी वाचले आहेत. यामध्‍ये कलबुर्गीतील इरफाना बेगमने म्‍हटले होते की, माझी शाळा घरापासून 5 किमी दुर आहे. सर्व येण्‍याजाण्‍यातच जातो. त्‍यामुळे मला मित्रांशी खेळायलाही वेळ मिळत नाही.'

 

2. दहशतवादाविरोधात एकजुट महत्‍त्‍वाची
- '26/11 हा संविधान दिवस आहे. याच दिवशी 9 वर्षांपूर्वी देशावर भयंकर दहशतवादी हल्‍ला करण्‍यात आला होता. या हल्‍ल्‍यात जे बळी पडले होते. त्‍यांच्‍याप्रती आम्‍ही श्रद्धांजली अर्पण करतो. त्‍यांच्‍या बलिदानाला देश कधीही विसरु शकत नाही. दहशतवाद मानवतावादी शक्‍तींना नष्‍ट करत आहे. अशात या शक्‍तींनी पुन्‍हा एकजुट दाखवली पाहिजे.'

 

3. जवानांची मदत करा
- 7 सप्‍टेंबररोजी आर्म्‍ड फोर्स फ्लॅग डे साजरा केला जातो. मला आनंद आहे की, रक्षा मंत्रालयने यावर्षी 1 ते 7 सप्‍टेंबरदरम्‍यान याचा सप्‍ताह साजरा करण्‍याचे ठरवले आहे. यानिमित्‍त आर्म्‍ड फोर्स फ्लॅग वाटा, व्हिडिओ शेअर करा. यातून जमा होणारी रक्‍कम आर्म्‍ड फोर्सच्‍या कल्‍याणासाठी वापरली जाते. यानिमित्‍त आपण सर्वांनी जवानांची मदत केली पाहिजे.

 

4. दिव्‍यांग कोणापेक्षाही कमी नाही
- दिव्‍यांग कोणापेक्षाही कमी नाही. मध्‍यप्रदेशमध्‍ये 8 वर्षांच्‍या तुषारने गाव पाणंदमुक्‍त करुन दाखवले आहे. त्‍याने शिटी वाजवून लोकांना उघड्यावर शौचास जाण्‍यापासून रोखले.

 

5. मातीच्‍या महत्‍त्‍वाला ओळखा
- 5 डिसेंबररोजी सॉईल कंर्झव्‍हेशन डे आहे. पृथ्‍वीचा माती हा सर्वात महत्‍त्‍वपूर्ण भाग आहे. माती नसली तर जीव, जंतू, झाडे काहीच असणार नाही. काही शेतकरी याप्रती जागरुक होताना‍ दिसत आहे. रासायनिक खतांनी मातीची उत्‍पादकता कमी होते. त्‍यामुळे ते आता जैविक खते वापरण्‍याला प्राधान्‍य देत आहे.    

बातम्या आणखी आहेत...