आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP\'s Anthem For 2014 Elections: \'Main Desh Nahin Mitne Doonga\'

VIDEO: भाजपचे प्रचारगीत लॉन्च, सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणूक प्रचारासाठीचे गाणे आज (मंगळवार) लॉन्च केले आहे. या गाण्याचे शिर्षक आहे, 'सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा' . भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील काही तुकडे या गाण्यामध्ये आहेत.
भाजपच्या मुख्यालयात या प्रचारगीताचे लॉन्चिंग करण्यात आले. यावेळी पक्षाचे नेते आणि अमृतसर येथील लोकसभेचे उमेदवार अरुण जेटली म्हणाले, ' या गाण्याच्या माध्यमातून भाजप आणि मोदींच्या संकल्पनेतील भारताचे चित्र उभे करण्यात आले आहे. प्रचारादरम्यान लवकरच या गाण्याचा ऑडिओ आणि व्हिडिओ पाहायला मिळेल.'
या गाण्याच्या व्हिडिओमध्ये देशातली प्रत्येक भागातील जनतेला दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यासोबतच महिला, युवक, मजूर, व्यापारी, महाविद्यालयीन युवक-युवती दाखवण्यात आले आहेत.
पुढील स्लाईडवर बघा भाजपचे प्रचारासाठीचे गाणे...