आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटी, नोटबंदीवरून गुजरातची विधानसभा निवडणूक भाजपसाठी आव्हान- शत्रुघ्न सिन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जीएसटी, नोटबंदीवरून जनतेमध्ये तीव्र नाराजी असल्यामुळे गुजरातची विधानसभा निवडणूक भाजपसाठी आव्हान आहे, असे भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले आहे. एका पुस्तकावरील चर्चा कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेस नेते मनीष तिवारीदेखील होते. वकील माणूस अर्थविषयक बाबींवर बोलू शकतो. टीव्ही अभिनेत्री मनुष्यबळ विकास मंत्री होऊ शकते. ‘चायवाला’ देखील..मग मी अर्थ विषयावर का बोलू शकत नाही? अशी सुरुवात शत्रू यांनी केली. लोकांमध्ये रोष आहे. बेरोजगारी वाढू लागली आहे. भाजपला गुजरातमध्ये नक्की किती जागा मिळतील, हे मला सांगता येणार नाही. मात्र, राज्यातील ही निवडणूक भाजपला जड जाणार आहे, असा दावा त्यांनी केला.  
बातम्या आणखी आहेत...