आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP\'s Cold War Heats Up: Gadkari Turns Down Advani\'s Proposal

भाजपमधील अंतर्गत कलह : अडवानींची ऑफर चाणाक्ष नितीन गडकरींनी नाकारली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकाच्या आधीच भाजप अंतर्गत कलहाने पुरता पोकरला असल्याचे दिसून येत आहे. पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंह ही गोष्ट लाख दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत पण एकापाठोपाठ एक घटना पुढे येतच आहेत.

ताज्या वृत्तानुसार ही माहिती पुढे येत आहे की, या वर्षाअखेरीस महत्त्वाच्या चार-पाच राज्यात होणा-या विधानसभा निवडणुकीत प्रचार समितीचे प्रमुखपद नरेंद्र मोदींऐवजी माजी अध्यक्ष नितिन गडकरी यांच्याकडे द्यावे, असे मत अडवानी यांनी व्यक्त केले होते. मात्र, या वादावर खुद्द गडकरी यांनीच पडदा टाकत आपण प्रचार प्रमुखपदी काम करणार नसल्याचे म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांचे नाव याआधीच जाहीर केल्याने प्रचार समितीचे प्रमुखपद स्वीकारणार नसल्याचे सांगत अडवानी यांना चांगलाच झटका दिला आहे.

गडकरी यांनी म्हटले आहे की, नरेंद्र मोदी यांचे नाव पक्षाने आधीच पुढे केले आहे. राजकीय वर्तुळात मात्र याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जात आहे. अडवानी आणि मोदी यांच्यातील वाढता संघर्ष व दुरावा पाहता या दोघांतील शीतयुद्ध येत्या काही महिन्यात वाढले तर नवल नसेल, असे सांगितले जाते. याबाबत सांगितले जात आहे की, राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यासह इतर राज्यांच्या विधानसभेच्या निवडणूका वर्षअखेर होत आहेत. राजस्थान वगळता इतर राज्ये भाजपकडे आहेत व तेथे पुन्हा सत्तेत येणयाची चिन्हे आहेत. तसेच राजस्थानमध्ये सुद्धा वसुंधरा राजे व कटारिया यांच्यातील वाद मिटवल्याने भाजपला सत्तेत येण्याचा विश्वास आहे. या सर्व घडामोडी पाहता नरेंद्र मोदींना प्रचार समितीचे प्रमुखपद दिल्यास मोदी व त्यांचा गट पक्षासह सर्वत्र मोदींचा गवगवा करतील व याचे सारे श्रेय मोदींना देतील, या शक्यतेने अडवानी गटाने ही खेळी करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अडवानी यांनी गडकरी यांच्याशी याबाबत चर्चा केली. तसेच ही मोठी संधी असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच आपण अध्यक्षपदी असताना पक्षाच्या एका नेत्याने मला तुमच्याबाबत चुकीची माहिती दिली याबाबत चर्चा झाली. मात्र, आपल्या अध्यक्षपदाला अडवानी गटाचाच कसा विरोध होता, हे गडकरी विसरले नाहीत. तसेच मोदी आणि गडकरीसह संघातच लावून देण्याचा अडवानींचा हा डाव गडकरी यांना कळून येताच त्यांनी मोदी यांचे नाव आधीच जाहीर केले असल्याचे सांगत अडवानींच्या ऑफरला चक्क नकार दिला.

गडकरी यांच्या पूर्ती कंपन्यावर प्राप्तीकर विभागाचे छापे टाकण्यामागे आणि अध्यक्षपदावरुन हटविण्यामागे दिल्लीतूनच सूत्रे हालली होती. त्यात अडवानींचाच चांगलाच हात होता. त्यावेळी अडवानींना संघाने लादलेला अध्यक्ष नको होता म्हणून गडकरींना कामाला लावलेव राजनाथांना अध्यक्ष केले. आता तेच राजनाथसिंह अडवानींना धक्का देत मोदीमय झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे अडवानी त्रस्त आहेत. ही बाब आता चाणाक्ष गडकरी यांच्यात लक्षात आल्यावाचून राहिली नाही. त्यामुळेच मोदी यांचे नावे जाहीर केले असताना आता अचानकपणे माझे नाव पुढे करणे योग्य नसल्याचे सांगत अडवानींना दूर केले.