आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या संसदीय समितीत नरेंद्र मोदींचा समावेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचा दिल्ली मार्ग मोकळा झाल्याचे दिसत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी मोदींना भाजपच्या संसदीय समितीत महत्वाचे स्थान दिले आहे. भाजपमध्ये संसदीय समिती अतिशय महत्त्वाची मानली जाते. निवडणुकीचे प्रत्‍येक धोरण हीच समिती ठरवते. संसदीय समितीमध्ये बाळ आपटेंच्या जागेवर नरेंद्र मोदींना स्थान देण्यात आले आहे. बाळ आपटेंचे मागील वर्षी निधन झाले.

राजनाथसिंह यांनी मोदीचे जवळचे मानले जाणारे अमित शाह, वरुण गांधी, राजीव प्रताप रुडी,जेपी नड्डा, मुरलीधर राव, अनंत कुमार यांना महासचिव पद दिले आहे. परंतु महासचिव पदावरून उमा भारतींचे नाव शेवटच्या क्षणी काढून टाकण्यात आले. अमित शाह तुलसी प्रजापति फेक एनकाउंटर केसमध्ये जामिनावर बाहेर आहेत.

उमा भारती, सदानंद गौड़ा, बलबीर पुंज, सीपी ठाकुर, एसएस आहलूवालिया, प्रभात झा, किरण माहेश्वरी आणि स्मृति ईरानी यांना पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पद देण्यात आले आहे. श्याम जाजू, भूपेंद्र यादव, डॉ. अनिल जैन, विनोद पांडेय यांना राष्ट्रीय सचिव पद देण्यात आले आहे. राजनाथसिंह यांनी नवीन यादीसंदर्भात पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणीशी रविवारी सकाळी चर्चा केली होती.