आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INSIDE STORY: मुलासोबत आत्महत्या करणारा बन्सल करत होता मृत्यूंजय जाप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काॅर्पोरेट मंत्रालयातील माजी महासंचालक बालकृष्ण बन्सल व त्यांचा ३२ वर्षीय मुलगा योगेश मंगळवारी दिल्लीतील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळले. बन्सल, त्यांच्या मुलाने आत्महत्या केल्याचे पोलिस म्हणतात. घराच्या चारही खोल्यात ५ पानी सुसाइड नोट मिळाली. त्यात बन्सल यांनी सीबीआय अधिकाऱ्यांवर छळाचा आरोप केल्याचे सांगितले जाते.
हे संपूर्ण प्रकरण भ्रष्टाचाराशी संबंधित आहे. १७ ऑगस्ट रोजी सीबीआयने बन्सल यांना एका हॉटेलवर छापा मारून ९ लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले होते. त्यानंतर त्यांना तुरुंगात टाकले होते. दोन दिवसांनंतर बन्सल यांची पत्नी सत्यबाला व मुलगी नेहाने फाशी घेतली. सीबीआय छाप्यामुळे आमची बदनामी झाली. त्या धक्क्यामुळे आत्महत्या करत असल्याची सुसाइड नोट त्यांच्याजवळ सापडली होती. पत्नी व मुलीच्या अंत्यसंस्कारासाठी बन्सल यांना हंगामी जामीन मिळाला तेव्हा ‘जीवन चलते रहना है’ असे हताश होऊन ते म्हणाले होते. ३० ऑगस्टपासून ते नियमित जामिनावर होते. ‘आई व बहिणीच्या मृत्यूनंतर मुलगा योगेश दगडासारखा झाला. तो कुणाशी बोलत नाही की कुठे येत-जात नाही. त्याची देखरेख गरजेची आहे,’ असे सुनावणीवेळी बन्सल म्हणाले होते. तुरुंगातून सुटल्यावर बन्सल व योगेश हरियाणातील हिसारला गेले होते. १० दिवसांपूर्वीच ते दिल्लीत परतले होते. आणि शेवटी त्याच फ्लॅटमध्ये त्यांनी आत्महत्या केली. बन्सल कुटुंबाचे पंडित अनुपप्रसाद पांडे म्हणाले, ‘ १५ दिवसांपासून बन्सल घरात महामृत्युंजय जपासह अनेक पूजापाठ करत होते. सोमवारी रात्री त्यांनी मला बोलावले व २१०० रुपये दिले. अजून जप बाकी आहे, असे मी म्हटल्यावर तुम्ही जप करा. आम्ही १५ दिवसांसाठी बाहेर जात आहोत, असे ते म्हणाले होते.’ बन्सल यांच्याशी बोललेले अनुप शेवटचे व्यक्ती होते. पोलिस आयुक्त ऋषिपाल सिंह म्हणाले, बन्सल व त्यांच्या मुलाचा मृतदेह सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता फ्लॅटमध्ये आढळला. सर्वात आधी घटनेची माहिती त्यांच्या मोलकरणीने दिली. बन्सल यांचा मृतदेह पत्नीच्या तर योगेशचा मृतदेह बहिणीच्या खोलीत आढळला. घरात सुसाइड नोटचे चार सेट्स मिळाले. त्यात पाचपानी सुसाइड नोट वडिलाची तर दोन पानी मुलाची आहे. त्यात नातेवाइकांच्या फोन नंबरसह दोघांचे फोटोही आहेत. आपल्यानंतर मालमत्तेचा वारस कोण असेल हेही त्यात नमूद आहे. पोलिस सध्या त्याचा तपशील देत नाहीत. सोमवारीच सीबीआने बन्सल यांना तपासासाठी बोलावले होते.
९ लाख घेताना जाळ्यात
फार्मा कंपनीचे कर प्रकरण दाबण्यासाठी बंसल यांच्यावर २० लाखांची लाचखोरीचा आरोप आहे. ११ लाख रुपये १६ जुलैला घेतले. ९ लाखांचा दुसरा हप्ता घेताना पकडले गेले लाखांचाआरोप आहे. टीव्ही अभिनेता अनुज सक्सेनाही या प्रकरणात आरोपी आहे.
बातम्या आणखी आहेत...