आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Black Money Case : SC Tells Centre To Form SIT Within A Week

BLACK MONEY: आठवडाभरात SIT स्थापन करा, सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : परदेशातील बँकांमध्ये जमा असणा-या भारतीयांच्या काळ्या पैशाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला दिला आहे. एका आठवड्यात या पथकाची स्थापना करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचे दोन निवृत्त न्यायाधीश या पथकाच्या कामावर देखरेख ठेवणार आहेत. जर्मनीने भारताला एलजीटी बँकेमध्ये खाते असणा-या भारतीय खातेधारकांची नावे दिली आहेत. त्यासंबंधीची कागदपत्रे आणि माहिती सुरक्षीत राहिल यांची काळजी घेण्याचे निर्देशही न्यायालयाने केंद्राला दिले आहेत. महसूल सचिवांनी या कागदपत्रांचा योग्य सांभाळ करावा असे न्यायालयाने म्हटले आहे.
गुरुवारी शास्त्री भवन येथे लागलेल्या आगीत काही महत्त्वाच्या कागपत्रांची हानी झाली. त्या पार्श्वभूमीवर काळ्या पैशासंबंधींच्या कागदपत्रांबाबत काळजी व्यक्त करणारी याचिका राम जेठमलानी यांनी दाखल केली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत.
एलजीटी बँकेत खाते असणा-यांसंदर्भात राम जेठमलानी यांना माहिती द्यावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने यूपीए सरकारला दिले होते. मात्र, यूपीए सरकारने पुन्हा त्यावर पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मात्र, शुक्रवारी न्यायालयाने स्पष्ट केले की, आता यापुढे काळ्या पैशाच्या संबंधी कोणत्याही निर्णयावर पुनर्विचार केला जाणार नाही.
न्यायालयाने याआधी 1 मे 2014 रोजी दिलेल्या निकालात केंद्र सरकारला एसआयटी स्थापन करण्याची अधिसूचना काढण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत दिली होती. ती मुदत गुरुवारी संपली आहे.