आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटबंदीनंतर 4,663 कोटी रुपये काळा पैसा आला समोर, 562 कोटी रुपये जप्‍त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली -  नोटबंदी निर्णयानंतर 1 जानेवारीपर्यंत आयकर विभागाने देशभर टा‍कलेल्‍या धाडीत 4663 कोटी रुपये इतका काळा पैसा समोर आला आहे. त्‍यातील 562 कोटी रुपये जप्‍त करण्‍यात आले. जवळपास 1100 प्रकरणात कारवाई झाली. 110 कोटी रुपये नव्‍या नोटांच्‍या स्‍वरुपात होत्‍या.   
 
- एका वृत्‍त संस्‍थेने आयकर विभागाच्‍या हवाल्‍याने सांगितले कि, नोटबंदीनंतर देशभरात एकुण 562 कोटी रुपये जप्‍त झाले. यामध्‍ये 110 कोटी रुपये नव्‍या नोटांच्‍या स्‍वरुपात होते. 
- ज्‍या 1100 प्रकरणात कारवाई झाली. त्‍यातील 289 प्रकरणात रक्‍कम जप्‍त करण्‍यात आली. 253 ठिकाणी छापे मारण्‍यात आले तर 556 ठिकाणांचे सर्वेक्षण करण्‍यात आले. 
- 8 नोव्‍हेबंर ते 1 जानेवारीपर्यंत 4663 कोटी रुपये काळा पैसा समोर आला आहे.  
- आयकर विभागाने 5062 व्‍यक्तिंना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. 
 
डिसेबंरमध्‍ये 3185 कोटी काळा पैसा आला होता समोर 
- आयकर विभागाने डिसेबंर महिन्‍यात केलेल्‍या कारवाईमध्‍ये 3180 कोटी रुपये इतका काळा पैसा समोर आला होता.  
- डिसेबंरमध्‍ये आयकर विभागाने 86 कोटी रुपये जप्‍त केले होते. 
- नोटबंदीनंतर सीबीआय, पोलिस, अमंलबजावणी विभागानेही काळ्या पैशांविरोधात कारवाई केली, यामध्‍ये मोठया प्रमाणात काळा पैसा उघड झाला आहे.  
 
48 तासात 1250 कोटीच्‍या सोन्‍याची विक्री 
- नोटबंदीनंतर काळ्या पैशाला सफेद करण्‍यासाठी लोकांनी मोठया प्रमाणात सोन्‍याची खरेदी केली.
- डायरेक्‍टरेट जनरल ऑफ सेन्‍ट्रल एक्‍साइज इंटेलिजन्‍स (डीजीसीईआय)च्‍या सर्वेक्षणामध्‍ये समोर आले आहे कि, नोटबंदीनंतर 48 तासात देशभरात जवळपास 4000 किलो सोन्‍याची विक्री झाली. याची किंमत 1250 कोटी रुपये आहे. 
- यातील 2000 किलो सोन्‍याची विक्री नोटबंदीची घोषणा झाल्‍याच्‍या रात्रीच झाली.    
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...