आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळा पैसा प्रकरणात एसआयटी स्थापनेला आठवडाभर मुदत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- काळा पैसा प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यास सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आणखी आठवडाभराची मुदत दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायमूर्ती एम.बी. शहा यांच्या न्यायपीठाने एसआयटीच्या स्थापनेबाबत केंद्राने तीन आठवड्यांच्या आत अधिसूचना जारी करावी, असे आदेश न्यायालयाने दिले होते. ही मुदत गुरुवारी संपली. न्या. बी.एस. चौहान आणि ए.के. सिकरी यांच्या न्यायपीठाने याप्रकरणी शुक्रवारी सुनावणी केली. सर्व दस्तऐवज महसूल विभागाच्या सचिवस्तर अधिकार्‍याच्या देखरेखीखाली ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी ही याचिका दाखल केलेल्या याचिकेवर हे आदेश दिले. दिल्लीच्या शास्त्री भवनाला लागलेल्या आगीत महत्त्वाची कागदपत्रे भस्मसात झाली, असा त्यांचा आरोप होता. सर्व कागदपत्रे शास्त्री भवनमध्ये नव्हे तर नॉर्थ ब्लॉकमध्ये ठेवण्यात आली असल्याचे सॉलिसिटर जनरल मोहन पाराशरन यांनी सांगितले.