आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाग मतदार राजा जाग: काळ्या पैशाविरोधात आयोगाची मोहीम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- निवडणुकीत काळा पैसा येण्यापासून रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी निवृत्त बँक, सरकारी अधिकारी, पत्रकारांच्या सहभागातून मतदारांशी संवाद साधला जाणार आहे.
निवडणूक आयोग सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत ग्राम व वॉर्ड स्तरावर जनजागृती गट स्थापन करून काळ्या पैशाच्या गैरवापराबाबत चर्चा करणार आहे. काळ्या पैशाच्या वापराच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या मतदारसंघामध्ये त्यात जास्त भर देण्यात येणार आहे. चर्चा कार्यक्रमात निवृत्त बँक, सरकारी अधिकारी, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजातील प्रतिनिधींचा समावेश आहे. यामध्ये गटचर्चा, स्थानिक मतदारांसोबत संवाद साधला जाणार आहे. मतदारांनी मद्य, पैशाच्या प्रलोभनापासून दूर राहावे यासाठी ‘नुक्कड’द्वारे प्रबोधन केले जाणार आहे.

नैतिक मतदानाचे महत्त्व
आयोगाने स्थापन केलेला गट मतदारांच्या घरोघरी जाऊन मोहीम चालवणार आहे. गेल्या निवडणुकीतील अनुभवाच्या आधारावर जनजागरण मोहिमेसाठी मतदारसंघाची निवड करण्यात आली आहे. पाच ते दहा सदस्यांचा गट नैतिक मतदानाचे महत्त्व पटवून देईल.

चर्चा कार्यक्रमात स्थानिक निवडणूक अधिकारी सहभागी होणार आहेत. पैशाचा गैरप्रकार आढळल्यास निवडणूक आयोगाच्या गटाला ही बाब निदर्शनास आणून देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

पैसे नेण्यावर बंधने नाहीत
नवी दिल्ली । निवडणूक आयोगाच्या निवडणुकीतील काळ्या पैशाविरोधातील अभियानाच्या पार्श्वभूमीवर लोकांना वैध पैसा बाळगण्यास कसलीही आडकाठी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, आवश्यकता भासल्यास संशयास्पदरीत्या नेल्या जाणार्‍या पैशाबाबत चौकशी करण्याचा आयोगाच्या पथकाला अधिकार असल्याचे सांगण्यात आले. 5 मार्च रोजी निवडणुकीची घोषणा करण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाने खर्चावर निगराणी ठेवणारी पथके नियुक्त केली. निगराणी पथकाला संशयास्पद रोकड तपासणीचे अधिकार देण्यात आले आहेत. निवडणुकीतील काळा पैसा रोखण्यासाठी निवडणूक खर्च देखरेख पथकाची(ईईएम) स्थापना करण्यात आली होती. वैयक्तिक स्तरावर निवडणूक काळात पैसे नेण्यावर र्मयादा नाहीत. मात्र, 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम असल्यास आयोगाकडे विवरण देणे आवश्यक आहे.