आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Black Money News In Marathi, Arun Jaitley, Loksabha

‘ब्लॅक मनी’ लवकरच आणू; अर्थमंत्री अरुण जेटली यांचा विश्वास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशाबाहेर गेलेला भारताचा काळा पैसा लवकरच देशात परत आणला जाईल. त्यासाठी नागरिकांना फार काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. लवकरात लवकर हा पैसा परत आणला जाईल, असा दावा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी केला आहे. लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.

याआधी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी काळा पैसा देशात परत आणण्याच्या सरकारच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी गुरुवारी म्हटले होते की आयुष्यात कधीच आपण स्वित्झर्लंडकडून काळा पैसा परत आणू शकणार नाही. त्यांच्या या वक्तव्याचा सहज शैलीत समाचार घेताना जेटली म्हणाले, ‘काळा पैसा परत आणण्यासाठी खासदार आणि देशाला फार मोठी प्रतीक्षा करावी लागणार नाही. काल बोलताना आमचे सहकारी निशिकांत दुबे फार चांगले बोलले. परंतु बोलता बोलता म्हणाले की त्यांच्या आयुष्यात कधीच काळा पैसा परत मिळणार नाही. आम्ही सर्वजण त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतो. परंतु यासाठी त्यांना दीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. काळा पैसा लवकरच आणि नक्की परत येईल. करचोरीसाठी आर्शयस्थान मानल्या जाणार्‍या देशांकडून आम्हाला त्याबाबत माहिती मिळण्यास सुरुवात झाली आहे.’ जेटलींच्या या वक्तव्यावर लोकसभेत हास्याचे फवारे उडाले. जेटलींच्या उत्तरानंतर लोकसभेत 2014 चा अर्थसंकल्प आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला.
जेटलींच्या मोठय़ा घोषणा
1. अर्थसंकल्पात युद्ध स्मारकाची घोषणा करण्यात आली होती. हे स्मारक 1947 नंतर आतापर्यंत देशासाठी शहीद झालेल्या 21 हजार जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बनवले जाईल.
2. या वर्षाच्या अखेरपर्यंत देशात जीएसटी (गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स) लागू केला जाईल. यामुळे व्हॅट, उत्पादन शुल्कासारखे वेगवेगळे कर संपुष्टात येतील आणि एकच प्रणाली लागू होईल.