आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Black Money News In Marathi, Swiss Bank, P Chidambarm

\'ब्लॅक मनी\'बाबत स्वित्झर्लंडची टाळाटाळ; \'जी20\'मध्ये ओढण्याचे भारताचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- स्वित्झर्लंडमधील बॅंकांमध्ये असलेल्या भारतीयांच्या काळा पैशाबाबत (ब्लॅक मनी) माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे. भारताकडून याबाबत वारंवार विचारणा करूनही स्वित्झर्लंडकडून सहकार्य मिळत नसेल तर हा मुद्दा जी20 सारख्या बहुराष्ट्रीय बैठकीत मांडण्यात येईल, असा इशारा केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम् यांनी गुरुवारी दिला.

चिदंबरम यांनी स्वित्झर्लंडच्या अर्थमंत्र्यांना दोन पानी पत्र पाठवून 2009 मध्ये झालेल्या जी20 बैठकीची आठवण करून दिली आहे. जी 20 बैठकीत बॅंकाच्या गोपनियतेबाबत महत्त्वपूर्ण घोषणा करण्‍यात आली होती. अवैध प्रकरणात अन्य देशांना सहकार्य करण्‍याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, स्वित्झर्लंडकडून भारतीयांच्या काळ्या पैशाबाबत नेहमी असहकार्य केले जात आहे. स्वित्झर्लंडची भविष्यातही अशीच भूमिका कायम राहिल्यास असहकार्य करणारा देश घोषित करण्याची मागणी करू , असाही इशारा पी चिदम्बरम् यांनी दिला आहे.

चिंदबरम म्हणाले, स्वित्झर्लंड डीटीएए कराराचे उल्लंघन करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. डीटीएए करारानुसार भारतीय अधिकारी स्विस बॅंकांना भारतीय नागरिकांच्या खात्यांची माहितीची मागणी करत आहेत.

दरम्यान, प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना भारताने स्वित्झर्लंडसोबत बँकिग व्यवहाराची माहिती आदानप्रदान करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे स्विस बॅंकांमध्ये भारतीयांच्या काळ्या पैशाबाबत माहिती मिळण्याची आशा होती. परंतु स्वित्झर्लंड सरकारकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळात नाही.