आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Black Virus Dengrous For Online Affairs, Steal Personal Information

ऑनलाइन व्यवहाराला ब्लॅक व्हायरसचा धोका,ग्राहकाची वैयक्तिक माहिती चोरू शकतो हा व्हायरस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ऑनलाइन बँकिंग ट्रांझेक्शनसाठी धोकादायक असलेली व्हायरस सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी शोधून काढली आहेत. ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरण्याची क्षमता या व्हायरसमध्ये असल्यामुळे डेबिट कार्ड स्विप करणा-या ग्राहकांनी यापासून सावध राहावे, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
‘डेक्स्टर, ब्लॅक पीओस, मेमरी डंप अँड ग्रॅबर’ अशी या व्हायरसची नावे असून त्यांना ब्लॅक व्हायरस नावाने ओळखले जाते. डेबिट कार्डधारकांनी कोणत्याही प्रकारची खरेदी करताना प्रत्येकवेळी पिन क्रमांक नोंदविणे अनिवार्य असल्याचा आदेश भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर 2013 मध्ये दिला होता, परंतु त्यानंतर हे ब्लॅक व्हायरस सक्रिय झाल्याचे सांगितले जात आहे.
किती प्रमाणात धोकादायक : ब्लॅक व्हायरस सिस्टिममध्ये प्रवेश करून कार्डधारकाचे नाव, खाते क्रमांक, कार्डची एक्स्पायरी डेट, सीव्हीव्ही कोड आणि अन्य माहिती चोरून घेतो. केवळ इतकेच नव्हे तर वैयक्तिक माहिती चोरून घेतल्यानंतर हा व्हायरस संबंधित संगणकातून आपोआप नष्ट होऊन जातो. कोणत्याही सिस्टिमच्या हार्डडिस्कमध्ये न घुसता थेट हल्ला करण्याची क्षमता या व्हायरसमध्ये आहे.
सावध राहण्याचा इशारा
पॉइंट ऑफ सेलवरील सर्व सॉफ्टवेअर अपडेटेड ठेवली जावीत तसेच त्यावर केवळ खरेदीसंबंधितच कारवाई केली जावी, असा इशारा कॉम्प्युटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीमने दिला आहे. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड स्विप करणा-या मशीन्स ऑटो प्ले किंवा ऑटो रनमोडवर नसल्याची खात्री रिटेलरनी करून घ्यावी, असेही त्यांनी सांगितले आहे.