आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'ब्‍लॅकबेरी\'तील माहिती भारतीय तपास यंत्रणांना पुरविण्‍यास \'रिम\' तयार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- 'ब्लॅकबेरी' मोबाईल फोनची निर्माती 'रिसर्च इन मोशन' एकीकडे मोठ्या स्थित्‍यंतरातून जात असताना कंपनी विकण्‍याच्‍या तयारीत आहेत. तर दुसरीकडे कंपनीला भारत सरकारसमोर झुकावे लागले आहे. राष्‍ट्रीय सुरक्षेसाठी ब्लॅकबेरी फोनमधील मेसेजेस, इ-मेल, अटॅचमेंट, ब्लॅकबेरी मेसेंजरवरील चॅट, पुश मेल, फोन कॉल संदर्भातील सर्व तपशिल सरकारला पुरविण्‍यास 'रिम'ने सहमती दिली आहे. त्यामुळे गरज पडल्‍यास भारतीय तपास यंत्रणा ही माहिती मागवू शकतात.

'ब्‍लॅकबेरी'ची माहिती देण्‍यासाठी 'रिम'ने नकार दिला होता. सर्व्हर भारताबाहेर असल्यामुळे ब्लॅकबेरीमार्फत होणारी संदेशांची देवाण-घेवाण भारतीय यंत्रणांना तपासता येत नव्हती. त्‍यामुळे सरकारने कंपनीला दोन पर्याय दिले होते. 'ब्‍लॅकबेरी'चा सर्व्‍हर भारतात बसवा किंवा माहिती द्या. परंतु, 'रिम'ने ही मागणी फेटाळली होती. अखेर भारताने सेवाच बंद करण्‍याचा इशारा दिल्‍यानंतर कंपनीला झुकावे लागले.

'रिम'ने यासाठी आवश्‍यक ते बदल केले असून भारताला कायदेशीररित्‍या संदेश यंत्रणेची माहिती घेता येईल. यासंदर्भात जूनमध्‍ये एक बैठक झाली. त्‍यावेळी 'रिम'चे अधिका-यांनी गुप्तचर खात्‍याचे अधिकारी आणि दूरसंचार विभागाच्‍या अधिका-यांना ही माहिती कशी प्राप्‍त करता येईल, याचे प्रात्‍यक्षिक दिले. यासाठी मुंबईतील व्‍होडाफोनच्‍या नेटवर्कवर हे प्रात्‍यक्षित दाखविण्‍यात आले.