आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळा पैसा : स्वेच्छा घोषणेस 2 महिने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विदेशी बँकांमध्ये भारतीयांनी दडवून ठेवलेला काळा पैसा व्हाइट करण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी दिला जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कालावधी कमीत कमी ठेवण्याची सरकारची इच्छा आहे. त्याबाबतची अधिसूचना या महिनाअखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात जारी होण्याची शक्यता आहे. सरकारतर्फे देण्यात आलेली मुदत संपल्यानंतर मात्र काळ्या पैशाचा शोध लावण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या विरोधात कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर नियंत्रण मंडळाची एक टीम (सीबीडीटी) काळ्या पैशाच्या स्वेच्छा घोषणेचा मसुदा तयार करत आहे. महसूल विभागाच्या तपासानंतर हा मसुदा मंजुरीसाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींकडे पाठवला जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीडीटी या मुद्द्यावर काळ्या पैशावर स्थापन एसआयटीच्या संपर्कात आहे. ज्यांच्याविरोधात चौकशी सुरू आहे किंवा नोटीस पाठवण्यात आलेली आहे त्यांना या सुविधेचा लाभ घेता येतो की नाही, याबाबत बोर्ड त्यांच्याशी चर्चा करू इच्छिते.

नव्या कायद्यात दंडाची रक्कम मोठी, तुरुंगवासही काळ्या पैशावरील नवीन कायदा एप्रिल २०१६ पासून लागू होणार आहे. स्वैच्छिक घोषणा योजनेनुसार विदेशात दडवून ठेवलेली संपत्ती कोणताही भारतीय ३० टक्के कर आणि ३० टक्के दंड भरुन उर्वरित रक्कम वैध करता येऊ शकते. योजना बंद झाल्यानंतर काळा पैसा उघड झाल्यानंतर ३० टक्के कर आणि ९० टक्के दंड भरावा लागेल. याबरोबर तुरुंगातही जावे लागेल.

स्विस बँकेतील पैसे; यादीत भारत ६१ वा
झुरिचस्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये पैसे ठेवणार्‍यांच्या यादीत भारत ६१ व्या स्थानी आहे. यात चीन २६ व्या, तर पाकिस्तान ७३ व्या स्थानी आहे. या बँकांमध्ये दुसर्‍या देशांचे १०२ लाख कोटी रुपये जमा आहेत. त्यात भारतीयांचा वाटा अवघा ०.१२३ टक्के म्हणजे १२, ६१४ कोटी रुपये इतका आहे. चीनचा वाटा ०.५५ टक्के पाकिस्तानचा ०.०९ टक्के इतका आहे. स्वित्झर्लंडमध्ये यूबीएस क्रेडिट स्विसला मोठ्या बँकांचा दर्जा आहे. भारतीयांचा ८२ टक्के पैसा याच बँकांत आहे. याबाबतची आकडेवारी स्विस नॅशनल बँकेच्या वतीने ही जारी करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...