आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Blast In Hyderabad Made By Pakistani Person, Yasin Bhatkal Confess

हैदराबाद स्फोटाचा सूत्रधार पाकिस्तानी, यासीन भटकळची कबुली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - हैदराबादजवळील सायबराबादच्या दिलसुखनगरात पाकिस्तानी सूत्रधाराच्या सांगण्यावरूनच बॉम्बस्फोट घडवले आणि त्यासाठी स्फोटकेदेखील मीच पाठवली होती, अशी कबुली इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या यासीन भटकळ याने दिली आहे. चौकशीदरम्यान त्याने ही माहिती दिल्याचे पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले. 21 फेब्रुवारी रोजी झालेल्या या दुहेरी स्फोटात 17 जण ठार, तर 100 जण जखमी झाले होते. परदेशी कंपन्यांचा भारतातील उद्योग विस्तार रोखण्याच्या इराद्याने हा घातपात घडवण्यात आला होता.


चुलतभाऊ इक्बाल व रियाझ भटकळ यांच्याविषयीही यासीनने माहिती दिली. यंदाच्या सुरुवातीला इक्बाल नेपाळमध्ये आला होता. सॅटेलाइट फोनद्वारे तो पाकमधील म्होरक्याशी संपर्कात राहत होता, असेही त्याने सांगितले.
जर्मन बेकरीत बॉम्ब ठेवला


पुण्यातील जर्मन बेकरीत 13 फेब्रुवारी 2010 रोजी झालेल्या स्फोटाचीही कबुली यासीनने दिली. 17 जणांचे बळी घेणारा हा बॉम्ब आपणच पेरल्याचे तो म्हणाला. गर्दी होणार्‍या दुकानात तो ठेवला होता. जास्त नुकसान व्हावे म्हणून गॅस सिलिंडरजवळ स्फोटके ठेवण्यात आली होती, असे त्याने सांगितले, असा दावा तपास अधिकार्‍यांनी केला आहे.