नवी दिल्ली - येथे एका बिझनेसमनच्या एकुलत्या एक मुलाने घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. याचे कारण ब्ल्यू व्हेल गेम असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हे प्रकरण नॉर्थ-वेस्ट दिल्लीच्या अशोक विहारमधील आहे. मुलाची प्रकृती चिंताजनक असून त्याला गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरून मुलाचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे. त्याच्या मोबाइलच्या डाटाच्या माध्यमातून पोलिस माहिती घेत आहेत.
- नुकतेच मुंबईत मनदीप सिंह या विद्यार्थ्याने हा गेम खेळताना इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. केरळातही मनोज चंद्रन या 11वीच्या विद्यार्थ्याने फाशी घेतली होती. त्याच्या आईचे म्हणणे अाहे की, त्यांच्या मुलाने ब्ल्यू व्हेल गेममुळेच जीव दिला.
खोलीतून निघून छतावर पोहोचला
पोलिसांच्या माहितीनुसार, राजेश अग्रवाल आपल्या कुटुंबासह अशोक विहारच्या फेज-1 परिसरात राहतात. त्यांचा मुलगा कुश मोंटफोर्ड स्कूलमध्ये 11वीत शिकतो. बुधवारी दुपारी कुश आपल्या आईसह घरातच होता. यादरम्यान तो आपल्या खोलीतून निघून छतावर पोहोचला आणि घराच्या मागच्या भागात वरून उडी मारली.
- पोलिस म्हणाले की, आवाज ऐकून शेजारी राहणाऱ्या महिलेने कुशच्या कुटुंबीयांना कळवले. मग त्यांनी पोलिसांना माहिती दिली. तिथेच असलेल्या चौकीदाराच्या मदतीने कुशला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. त्याची प्रक़ृती गंभीर असून डॉक्टरांनी फोर्टिस रुग्णालयात रेफर केले आहे.
छतावर आढळला मोबाइल
- पोलिस टीम घटनास्थळी पोहोचेपर्यंत मुलाला रुग्णालयात नेण्यात आले होते. त्याच्या घराच्या छतावर त्यांना त्याचा मोबाइल, चष्मा आणि स्लिपर आढळली.
- पोलिस म्हणतात, ही परिस्थिती पाहून असे वाटतेय की कुश खेळत-खेळतच छतावर आला आणि तिथेच त्याने चप्पल आणि चष्मा काढून छतावरून उडी मारली.