आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ALERT : असे चेक करा मुलाच्या फोनमध्ये \'Blue Whale\' गेम आहे की नाही...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - भारतात या जिवघेण्या गेमची एंट्री झाली असून त्याने मुंबईत एका 14 वर्षांच्या मुलाचा जीव घेतला आहे. रशियात बनवण्यात आलेल्या या गेमचे नाव 'Blue Whale Challenge' असे आहे. या गेमला 'द ब्लू व्हेल गेम' असेही ओळखले जाते. जगभरात या गेमच्या नादात 250 हून अधिक मुलांनी आत्महत्या केली आहे. त्यावरून गेम किती जिवघेणा आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो. त्यामुळे, आपल्या मुलाच्या मोबाईलमध्ये हा गेम असेल तर तो लगेच अशा पद्धतीने डिलीट करा...
 
 
अंधेरी ईस्ट येथे 14 वर्षीय विद्यार्थ्याने हायराईज बिल्डिंगवरून उडी मारून आत्महत्या केली. त्याच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे, आत्महत्या करण्यापूर्वी तो हाच इंटरनेट गेम 'ब्लू व्हेल चॅलेंज' खेळत होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने छतावर उभे राहून काही फोटोज घेतले होते. त्याने हे फोटोज मित्रांना व्हॉट्सअप सुद्धा केले. भारतात तो या गेमचा पहिला बळी ठरला. अशात DivyaMarathi.com सर्व पालकांना आवाहन करत आहे, की त्यांनी आपल्या मुलाच्या फोनमधून हा गेम अनइंस्टॉल करावा.
 

असा पत्ता लावा फोनमध्ये गेम आहे का...
स्मार्टफोन आल्याने मुले हुशार झाली यात शंका नाही. त्यांना आपल्या स्मार्टफोनच्या सर्व सेटिंग्स माहिती आहेत. अशात फोनमध्ये गेम आहे की नाही याचा पत्ता लावणे पालकांना अवघड जाऊ शकते. अशा हुशार मुलांच्या स्मार्टफोनमध्ये हा गेम आहे की नाही, याचा शोध घेण्यासाठी आपल्याला ह्या काळजी घ्याव्या लागतील.

- मुलाच्या फोनमध्ये अॅप लॉक आहे का?
- फोनमध्ये अॅप हाईड करणारे कुठले अॅप आहे का?
- प्ले स्टोरच्या मेन्युमध्ये जाऊन My Apps & Games चेक करावे.

असे करा चेक
- Settings => Device => Apps येथे जाऊन अॅप चेक करता येईल. 
- फोनमध्ये अॅप लॉक किंवा हाईड अॅप असेल तर Settings => Device => Apps मध्ये जाऊन अॅप ओपन करा. यानंतर खाली Options मध्ये जाऊन Force Stop करा... त्याने अॅप लॉक डिलीट होईल. 
 
 
प्ले स्टोरमध्ये हा गेम नाही
'ब्लू व्हेल चॅलेंज' हा गेम गुगल प्ले स्टोरवर नाही. अर्थात भारतात हा गेम प्ले स्टोरने अधिकृतरीत्या आणलेला नाही. अशात मुलं APK फाइल शोधून ते इंस्टॉल करत आहेत. कुठल्याही अॅपचे APK फॉरमॅट डाऊनलोड करण्यासाठी बऱ्याच वेबसाईट्स आहेत. Android तसले अॅप डाऊनलोड करण्याची परवानगी देत नाही. तरीही हुशार मुले अॅन्ड्रॉइड OS च्या Settings मध्ये जाऊन Unknown Sources चा पर्याय ON करतात. 
 
 
पुढील स्लाईडवर जाणून घ्या... असा आहे जिवघेणा खेळ...
बातम्या आणखी आहेत...