आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवघेण्या खेळातून वाचली ही मुलगी; तुमची मुलं तर खेळत नाही ना ब्ल्यू व्हेल गेम? असे करा चेक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीवघेण्या खेळातून बाहेर आली ही मुलगी. - Divya Marathi
जीवघेण्या खेळातून बाहेर आली ही मुलगी.
नवी दिल्ली - देशाच्या प्रत्येक भागात ब्ल्यू व्हेलचे जाळे पसरत चालल्याचे दिसत आहे. तुमचे मुलही या जीवघेण्या खेळाच्या जाळ्यात अडकले नाही ना, हे वेळीच ओळखा. वेळीच दिल्यास तुमच्या प्रिय मुलांचे प्राण वाचू शकतात. 
 
डोंगरावरुन उडी घेणाऱ्या मुलीने सांगितली आपबीती 
- राजस्थानमध्ये ब्ल्यू व्हेल गेमच्या जाळ्यात अडकलेली अल्पवयीन मुलगी आता स्वतःला सावरत आहे. या गेमचे शेवटचे टास्क पूर्ण करण्यासाठी तिने डोंगरावरुन उडी घेतली होती. मात्र स्थानिकांनी तिला वेळीच वाचवले. आता डॉक्टर आणि कुटुंबिय ती स्थीरस्थावर होण्याची वाट पाहात आहे. 
- 10 वीत शिकत असलेल्या या मुलीने सर्वांना आवाहन केले आहे की हा गेम खेळू नका. एवढेच नाही तर,  डाऊनलोड करुनही विषाची परीक्षा घेऊ नका. 
- मुलीने आधी चाकू विकत घेतला आणि हातावर ब्ल्यू व्हेलचे चित्र तयार करायला लागली. तिला दिलेल्या टास्क नुसार रात्रीच्या वेळी एकटी स्कूटी घेऊन डोंगरावर गेली आणि तिथून उडी घेतली. 
- टास्क पूर्ण केला नाही तर तुझ्या आईच्या जीवाला धोका असल्याची तिला धमकी देण्यात आली होती. 
 
हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहे मुलगी 
- मुलगी सध्या हॉस्पिटलमध्ये आहे. तिने सांगितले, की टीव्हीवर यासंबंधीच्या बातम्या येत होत्या म्हणून उत्सूकतेपोटी मी गेम डाऊनलोड केला. 
- रात्रभर गेम खेळत राहिले. ऑनलाइन चॅटिंग केली. या दरम्यान तिला मरण्यासाठी चार ऑप्शन देण्यात आले. त्यात ब्लेडने हातावर शार्क तयार करणे, छतावरुन उडी मारणे, समुद्रात उडी मारणे किंवा घरसोडून पळून जाण्यास सांगण्यात आले. 
- असे केले नाही तर तुझ्या आईच्या जीविताला धोका आहे असे सागून तिला गेमच्या जाळ्यात अडकवण्यात आले. यामुळे ती मानसिकरित्या आत्महत्येसाठी तयार झाली आणि तिने डोंगरावरुन उडी घेतील. 
- तिच्या या कृत्यामुळे तिच्या कुटुंबियाला धक्का बसला, ते अजून त्यातून बाहेर येऊ शकलेले नाही. 
 
तुमचे मुल तर ब्ल्यू व्हेल गेम खेळत नाही ना? 
- अॅडमिनकडून प्लेयरला 50 दिवस रोज वेगवेगळे टास्क दिले जातात. टास्क पूर्ण झाल्याचे फोटो शेअर करावे लागतात. सुरुवातीचे टास्क हे सोपे असतात मात्र हळुहळु टास्क खतरनाक होत जातात. शेवटी प्लेयरला अशा आवस्थेला नेऊन ठेवले जाते की अॅडमिनने दिलेला शेवटचा आत्महत्येचा टास्क पूर्ण करण्यासाठी तो शरीर आणि मनाने तयार झालेला असतो.
- गेम साधारण रात्री दोन ते चार दरम्यान खेळाला जातो. यावेळेत जर तुमचे मुल मोबाइल घेऊन बसत असेल तर त्याची चौकशी करा. स्वतः पाहा तुमचे मुल मोबाइलवर काय करत आहे? 
- ब्ल्यू व्हेल गेमचे शिकार साधारण 18 वर्षांच्या आतील मुले होत आल्याचे दिसले आहे. त्यामुळे तुमचे मुल या वयोगटातील असेल तर सतर्क राहा. सावधान राहा. 
 
मुलांना वेळ द्या, रोज मोबाइल चेक करा 
- डॉक्टरांनी आपील केले आहे की पालकांनी मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवला पाहिजे. 
- मुलांकडे त्यांचा स्वतःचा फोन असेल तर तो रोजच्या रोज चेक करत चला. 
- मात्र हे करत असताना आपल्या पाल्यांसोबत प्रेमाने वागा, त्यांच्यावर बळजबरी आणि अविश्वास दाखवू नका. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, डोंगरावरुन उडी घेणाऱ्या मुलीवर सुरु आहे उपचार... 
 
बातम्या आणखी आहेत...