आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्ल्यू व्हेल गेमवरुन सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला नोटीस, याचिकेत संपूर्ण बंदीची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जीवघेण्या ब्ल्यू व्हेल गेमवर पूर्णपणे बंदी घालण्याच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. या नोटीसवर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडून तीन आठवड्यात उत्तर मागवले आहे. रशियात तयार झालेल्या ब्ल्यू व्हेल गेमने गेल्या दोन महिन्यात भारतात 10 जणांचा बळी घेतला आहे. या गेमवर बंदी घालण्यात आली आहे, मात्र अद्यापही काही व्यक्तींकडे याच्या लिंक आहे. या गेने भारतासह चीन, अमिरेकासारख्या देशांमध्ये 130 जणांचा बळी घेतला आहे. 
 
 73 वर्षांच्या वकीलांनी दाखल केली याचिका 
 - ब्ल्यू व्हेल हा जीवघेणा गेम इंटरनेटवरुन पूर्णपणे बॅन केला जावा अशी याचिका मदुराई येथील 73 वर्षांचे वकील पोन्नियम यांनी केली आहे. 
 - मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा, जस्टिस ए.एम खानविलकर आणि जस्टिस डी.वाय चंद्रचूड यांच्या पीठाने यावर सुनावणी केली. 
 - पोन्नियम यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे, की ब्ल्यू व्हेल गेमवर बंदी आणण्यासाठी देशभरातील विविध कोर्टांमध्ये याचिका दाखल आहे. मात्र अद्याप त्यावर पूर्णपणे बंदी घातली गेली नाही. त्यामुळे मुलांचे मृत्यू काही थांबले नाही. 
बातम्या आणखी आहेत...