रायबरेली- जिल्ह्यातील सरेनीमधील गंगा नदीवरील चमरोली घाटावर आज (शुक्रवारी) एक नौका उलटली. दुर्घटनेत पाच मुलांचा मृत्यु झाला असून अनेक जण बेपत्ता आहे. नौकेत जवळपास दीड डझन लोक बसले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोताखोरांनी सहा जणांना सुखरुब पाण्याबाहेर काढले असून बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे. घटनेची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री अखिलेश यादव हे मंत्री मनोज पांडे यांच्यासोबत घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. तसेच कॉंग्रेसच्या अध्यक्षा आणि रायबरेलीच्या खासदार
सोनिया गांधी या देखील दिल्लीहुन रायबरेलीकडे रवाना झाल्या आहेत.
शुक्रवारी सकाळी सरेनीमधील चमरोली घाटावर गंगा स्नानासाठी लोक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. एका नौकेत बसून काही लोक नौकाविहार करत असताना ही दुर्घटना घडली. पाच मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.