नवी दिल्ली - राजधानीतील द्वारका सेक्टर-17 येथील एका हॉटेलात एका जोडप्याचे मृतदेह पंख्यावर लटकलेल्या अवस्थेत सापडले आहेत. प्रेम प्रकरणातून दोघांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला आहे. तरुण, तरुणीचे आयडी कार्ड पाहून त्यांच्या पालकांना कळवण्यात आले आहे. सीसीटीव्हीनुसार, हे कपल शुक्रवारी दुपारी 1.30 वाजता हॉटेलात दाखल झाले. ते रात्री 12 वाजता रूम रिकामी करणार होते. कित्येक मिनिटे दार वाजवल्यानंतरही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर हॉटेल मालकाने पोलिसांना घटनास्थळी बोलावले.
पोलिस म्हणाले...
डीसीपी साउथ-वेस्ट सुरेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, शुक्रवारी रात्री 12 वाजता कपल रूम रिकामी करणार होते. आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास मॅनेजरने पोलिसांना बोलावले. पोलिसांनी दार उघडले त्यावेळी दोघांचे मृतदेह पंख्यावर लटकले होते.
मुलगी एमबीबीएस विद्यार्थिनी, मुलगा अल्पवयीन
- पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, नवीन फास लावून फाशी घेण्यात आली आहे. आत्महत्या करण्यासाठी त्यांनी दोरी खरेदी केली होती. दोघांमध्ये अनेक दिवसांपासून प्रेम सुरू होते. त्या दोघांचेही मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेऊन सविस्तर तपासासाठी पाठवले आहेत.
- संशयित आत्महत्या करणारा मुलगा हा अल्पवयीन होता. तो 12 वीत शिकत होता. तर मुलगी ही 19 वर्षीय एमबीबीएस प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे. दोघेही दिल्लीतील रहिवासी होते.