आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Body Of Indian Prisoner, Who Died In Pak Jail, To Be Brought Back To India

हृदय-यकृत काढून पाकने भारतात पाठवली कैदी किरपालसिंहची बॉडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - पाकिस्तानातील तुरुंगात संशयास्‍पद मृत्‍यू झाल्‍यानंतर भारतीय कैदी किरपालसिंहचा मृतदेह वाघा बॉर्डरच्‍या मार्गाने भारतात आणण्‍यात आला. लाहोरच्‍या एका हॉस्पिटलमध्‍ये शवविच्‍छेदनादरम्‍यान हृदय व यकृत काढून मृतदेह भारतात पाठवण्‍यात आला आहे. मृतदेहासोबत आलेल्‍या सामानात काही पत्रही मिळाले आहेत. या पत्रांमध्‍ये त्‍याने तुरुंगातून सोडवण्‍यासाठी कुटुंबाकडे मागणी केली आहे. एका पत्रात लिहीले होते, तुरुंगातील अश्फाक धमकी देतो, तुझी कबर येथेच बनवेल....
- किरपालसिंहच्‍या मृतदेहासोबतच्‍यासाहित्‍यात एक पत्र मिळाले ते त्‍याने परिवारासाठी लिहीले होते.
- हे पत्र त्‍याने पोस्‍ट केले नव्‍हते. आधीच्‍या पत्रांचे त्‍याला उत्‍तर मिळाले नव्‍हते.
- पत्रात त्‍याने कुटुंबियांना म्‍हटले, मला भेटायला या, येथून माझी सुटका करण्‍यासाठी प्रयत्‍न करा.
- मी गुन्‍हेगार नाही, जबरदस्‍ती मला अडकवण्‍यात आले आहे, असेही त्‍याने लिहीले आहे.
- किरपालने लिहीले, '' तो ठीक अाहे. कित्‍येक पत्र पाठवले पण काही उत्‍तर आले नाही. कोणते पार्सलही मिळाले नाही.
- दुस-या पत्रात आपबीती सांगताना किरपालने जफर आणि अश्‍फाक यांचा उल्‍लेख केला.
- त्‍याने लिहीले, जफर त्‍याची काळजी घेतो, त्‍याच्‍यासोबत वेळ घालवतो.
- दुसरीकडे, अश्‍फाक मला आणि जफरला धमक्‍या देतो, म्‍हणतो यांची कबर जेलमध्‍येच बनवेल.
तुरुंगात झाला किरपालचा मृत्‍यू, पाकिस्‍तानवर लागले होते हे आरोप....
- अमृतसरमध्‍ये किरपालसिंहचे शवविच्‍छेदन करणा-या डॉक्‍टरांच्या चमूचे हेड डॉ. अशोक चावला म्‍हणाले, "बॉडीवर कोणत्‍याही आतून किंवा बाहेरून जखमा नाहीत. कोणत्‍या प्रकारचा हा घातपात असेल असे म्‍हणता येणार नाही."
- मंगळवारी दुपारी किरपालसिंहचा मृतदेह वाघा बॉर्डरच्‍या रस्‍त्‍याने भारतात आणण्‍यात आला.
- मृतदेह भारतात पोहोचल्‍यानंतर किरपालच्‍या पुतण्‍याने पुन्‍हा पोस्टमॉर्टम करण्‍याची मागणी केली.
- कुटुंबियांचा आरोप आहे की, किरपालच्‍या शरीरावर जखमांचे व्रण आहेत.
- किरपालसिंहचा (55) पाकिस्तानच्‍या कोट लखपत तुरुंगात संशयास्‍पद मृत्‍यू झाला.
- पाकिस्तान म्‍हणाले हा कोणता कट नाही. कृपालच्‍या छातीत दुखत असल्‍याने त्‍याला हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले होते.
-किरपाल 25 वर्षांपासून पाकच्‍या तुरुंगात होता.
- दावेदारांमध्‍ये किरपालची पहिली पत्‍नी कलानौर येथील परमजीत कौर सामील होती.
- किरपाल बेपत्‍ता झाल्‍यानंतर तिने दुसरे लग्‍न केले होते. ती देखील मृतदेह घेण्‍यासाठी मंगळवारी आली होती.
किरपाल कोण होता, कसा पोहोचला पाकिस्‍तानात....
- गुरदासपूरमधील मुस्तफाबाद सैंदा येथील किरपालसिंह 1991 मध्‍ये अचानक घरातून बेपत्‍ता झाला.
- काही वर्षांनी त्‍याचे घरच्‍यांना पत्र मिळाले व पाकच्‍या तुरुंगात असल्‍याचे कळले.
- किरपालचा पुतण्‍या अश्‍विनी कुमारने सांगितले, ते 13 वर्षापर्यंत सैन्‍यात होते.
- किरपालला 1991मध्‍ये पाकिस्तानच्‍या फैसलाबाद रेल्‍वे स्‍टेशनवर झालेल्‍या बॉम्‍बस्‍फोटाचा आरोपी ठरवण्‍यात आले होते.
- किरपालला 20 मे 2002 मध्‍ये पाकिस्तानच्‍या कोर्टाने पाच वेळा मृत्‍यूदंडाची शिक्षा सुनावली.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, किरपालसिंहचे पत्र, मृतदेह घेण्‍यासाठी समोर आले 7 दावेदार....