आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंगलच्या ऑडिशनमध्ये रिजेक्ट झाली होती ही अॅक्ट्रेस, या चित्रपटात मिळाला लीड रोल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्वेता आयएएस अधिकारी पी.के. त्रिपाठी यांची कन्या आहे. - Divya Marathi
श्वेता आयएएस अधिकारी पी.के. त्रिपाठी यांची कन्या आहे.
नवी दिल्ली - कान फेस्टिव्हलमध्ये गौरवला गेलेला सिनेमा 'मसान'मधून सर्वांच्या परिचयाची झालेली श्वेता त्रिपाठीने आपल्या पदार्पणातील चित्रपटातूनच बॉलिवूडमध्ये स्थान बळकट केले होते. श्वेता आयएएस पी.के.त्रिपाठी यांची कन्या आहे. त्रिपाठी दिल्लीचे आयुक्त राहिले आहेत. श्वेताला आमिर खानच्या दंगलमध्ये रिजेक्ट करण्यात आले होते, हे फार कमी लोकांना माहित आहे. 
 श्वेताची चर्चा यासाठी होत आहे, की आज (13 जानेवारी) श्वेताचा नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतचा चित्रपट प्रदर्शीत होत आहे. यानिमित्ताने divyamarathi.com सांगत आहे श्वेता त्रिपाठीबद्दल...
- एका मुलाखतीत श्वेताने सांगितले, की तिलाही आयएएस होण्याची इच्छा होती. मात्र हळुहळू तिचा कल अॅक्टिंगकडे वाढू लागला. 
- वडिलांबद्दल श्वेता सांगते, की ते म्हणायचे तु फक्त एकदा युपीएससीची परीक्षा तर देऊन पाहा. 
- वाईट वाटते की मी त्यांचे ऐकले नाही, मात्र मी आयएएस झाले नाही याचे दुःख नाही. वडिलांनी दिलेली शिकवण आणि त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा विश्वास मात्र मी त्यांना  देऊ इच्छिते. 
 
दंगलसाठी दिले होते ऑडिशन 
- श्वेताने आमिर खानची फिल्म दंगलमधील सना शेखच्या अभिनयाचे मोकळ्या मनाने कौतूक केले आहे. 
- ती म्हणाली, की मी देखील दंगलसाठी ऑडिशन दिले होते. गीता फोगट याच भूमिकेसाठी माझे ऑडिशन झाले होते, मात्र का माहित नाही माझे सिलेक्शन झाले नाही.
- नंतर या रोलसाठी सना शेखची निवड झाली. 
 
अनेक प्रसिद्ध जाहिरातींमध्ये झळकली श्वेता 
- श्वेता दिल्लीची आहे. लहानपणापासूनच तिला अॅक्टिंगची आवड होती. 20-22 वर्षांची असताना एका यूथ टीव्ही शोमध्ये तिची निवड झाली. अनेक अॅडमध्येही श्वेता झळकली आहे.
- मात्र तिला खरी ओळख मिळवून दिली ती नीरज घेवानची फिल्म 'मसान'ने. 
- या चित्रपटाच्या यशावर ती भलती खूश आहे. श्वेता सांगते, की ही फिल्म तिला इंडस्ट्रीमध्ये 8 वर्षे स्ट्रगल केल्यानंतर मिळाली होती.
- 'मसान'चे नाव घेताच श्वेताच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतो.
- 'मसान' आणि त्यातील तिच्या भूमिकेचे सर्वत्र कौतूक झाले होते. विशेषम्हणजे कान फिल्म फेस्टिव्हलमध्येही तिच्या भूमिकाल जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला होता.
- श्वेता सांगते, लोकांनी खूप कौतूक केले होते. चित्रपट संपल्यानंतर उभे राहून लोक टाळ्या वाजवत होते.
- तेव्हा वाटले होते की या लोकांना आपली भाषा येत नाही तरीही त्यांच्यापर्यंत आपण चित्रपट पोहोचवू शकलो, याचा अर्थ एक कलाकार म्हणून आपण केलेले काम योग्य प्रकारे केले आहे. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, हरामखोरची अभिनेत्री श्वेताचे निवडक फोटो... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)