आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संयुक्त राष्ट्रात योग दिनाला मधुर भांडारकरांची उपस्थिती; १९३ देशांच्या राजदूतांची हजेरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- संयुक्त राष्ट्राच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात बॉलीवूड निर्माते मधुर भांडारकर यांना विशेष पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.
संघटनेचे सरचिटणीस बान की मून, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, अाध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. त्याशिवाय १९३ देशांचे राजदूतदेखील या वेळी उपस्थित असतील. अशा प्रकारच्या समारंभात पाहुणे म्हणून निमंत्रण मिळणे हा माझ्यासाठी मोठा गौरव असल्याचे मी मानतो.

योग हे भारताचे संचित आहे. समारंभाला उपस्थित राहण्यासाठी मी उत्सुक आहे, अशी भावना ४६ वर्षीय भांडारकर यांनी व्यक्त केली आहे. यानिमित्ताने भारतीय चित्रपट उद्योगाला जागतिक व्यासपीठावर मांडण्याची संधी मिळाली आहे. या गोष्टीचा आनंद वाटतो. सेलिब्रिटींची हजेरी आताच्या काळात महत्त्वाची झाली आहे. लोकांना ती आदर्श वाटू लागते. खरे तर कलेला मर्यादा नसतात. चित्रपट ही जागतिक गोष्ट आहे. भारतीय चित्रपटाला आपली एक अशी आंतरराष्ट्रीय आेळख आहे.
सध्याचे जीवन अतिशय तणावपूर्ण झाले आहे. थोड्या व्यायामानेदेखील तणावमुक्ती शक्य आहे, असे भांडारकर म्हणाले. बॉलीवूडचे आघाडीचे दिग्दर्शक असलेल्या भांडारकरांचे ‘पेज थ्री’, ‘फॅशन ’ चांगलेच गाजले.

दरम्यान, योग दिनाच्या पूर्वतयारीसाठी शुक्रवारी देश-विदेशात योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. भारतात विविध शैक्षणिक तसेच सामाजिक संस्थांनी शिबिरे आयोजित करून सहभागी साधकांना योगाचे धडे दिले.
बातम्या आणखी आहेत...