आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्ली विमानतळावर 2 विमानांमध्‍ये बॉम्‍ब असल्‍याची माहिती: प्रवाशांमध्‍ये 4 खासदार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन विमानांमध्‍ये बॉम्‍ब असल्‍याची माहिती मिळाली आहे. यापैकी एक विमान एअरइंडियाचे आहे. ते दिल्लीवरून भुवनेश्वरला जाणार होते. दुसरे विमान नेपाळ एयरलाइन्‍सचे असून ते दिल्‍लीतून काठमांडूला जाणार होते. एअर इंडियाच्‍या विमानात 4 खासदार होते. दोन्‍ही विमानातील प्रवाशांना बाहेर काढण्‍यात आले आहे. कालही मिळाली होती बातमी..
- आयजीआय विमानतळावर बॉम्‍बशोध पथकाकडून बाॅम्‍बचा शोध घेतला जात आहे.
-विमानतळ प्राधिकरणाच्‍या गुडगांव मॉनिटरिंग सेंटरवर सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी एक फोन आला होता.
- प्राधिकरणाच्‍या सुत्रांच्‍या माहितीनुसार हा इंटरनेट बेस्ड कॉल होता.
- त्‍यानंतर गुडगांव सेंटरने विमानतळ प्राधिकरणाला तत्‍काळ याची माहिती दिली.
- दिल्लीवरून भुवनेश्वरला जाणा-या AI-275 आणि दिल्लीवरून काठमांडूला जाणा-या R-075 या विमानांना थांबवण्‍यात आले आहे.
- यापैकी एक विमान सकाळी 11 वाजता, दुसरे साडेअकरा वाजरा उड्डाण घेणार होते.
- नेपाळ एयरलाइन्‍सच्‍या विमानात 164 आणि एअर इंडियाच्‍या विमानात 180 प्रवाशी होते.
बुधवारी रात्रीही बॉम्‍बची अफवा
- दिल्लीवरून बँकॉक जाणा-या एअर इंडियाच्‍या विमानात बॉम्‍ब असल्‍याची अफवा बुधवारी रात्रीही पसरली होती.
- नंतर या विमानाला सुवर्णभूमी विमानतळाच्‍या रनवेवर एका बाजूला उभे करण्‍यात आले होते.
- या एअर इंडियाच्‍या फ्लाइट नंबर 332 मध्‍ये असलेल्‍या 241 प्रवाशांना तत्‍काळ बाहेर काढण्‍यात आले.
- रात्री उशीरापर्यंत शोध घेण्‍यात अाला मात्र, विमानात काही मिळाले नाही.
बातम्या आणखी आहेत...