आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bookie Tinku & Bhatiya Beaten To Chindila In Jail

बुकी टिंकू व भाटियाने चंडिलाला कोठडीतच धुतले, 85 लाखांचा बसला होता फटका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - स्पॉट फिक्सिंगमध्ये ठरल्याप्रमाणे वागला नाही म्हणून 85 लाख गमवावे लागल्यमुळे तोट्यात आलेल्या टिंकू दिल्ली व सुनील भाटिया या दोन बुकींनी आपला संताप पोलिस कोठडीतच काढला. बोलला तसा वागला नसल्याने या दोघांनी फिक्सर अजित चंडिलाला कोठतीच धुतले. तर इकडे मुंबईत चौकशी दरम्यान आमने- सामने आल्यावर गुरुनाथ मयप्पन हा विंदू दारासिंग याच्यावर चांगलाच भडकला. विंदू पोलिसांना सर्वच माहिती स्वत:हून सांगत असल्याने गुरु विंदूवर भडकल्याचे सांगण्यात येते.

स्पॉट फिक्सिंसगप्रकरणी नवी दिल्ली पोलिसांनी अटक केलेला टिंकू दिल्ली हा मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या रमेश व्यास या बुकीच्या संपर्कात होता. टिंकू दिल्ली थेट पाकिस्तानात बुकींशी बोलायचा. एवढेच नाही तर, टिंकू हा रमेश व्यासकडील 31 पैकी एक फोनलाइन पाकिस्तान आणि दुबईत बोलण्यासाठी वापरायचा.

मोठी पोहच असलेल्या टिंकूने चंडिलाला गळी उतरवले. 17 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्ससोबत आणि 22 एप्रिलला चेन्नई सुपरकिंग्जसोबत झालेल्या सामन्यांमध्ये अजित चंडिला याने फिक्सिंग केले होते. मात्र जसे ठरले तसे अजित चंडिला याने केलेच नाही. त्यामुळे टिंकू आणि भाटियाला 85 लाख रुपयांचा फटका बसला. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर संतापलेल्या टिंकू - भाटिया जोडीने चंडिलाला कोठडीतच धो-धो धुतले.

दरम्यान, इकडे मुंबईतही गुरुनाथ मयप्पन विंदूवर चांगलाच लाल आहे. पोलिसांच्या ताब्यात असल्यापासून विंदू बेटिंगदरम्यान झालेल्या चर्चेतील सर्व बारीकसारीक गोष्टी पोलिसांना सांगत आहेत. विंदू याच्यामुळेच आपण अधिक अडकत चालल्याचे लक्षात येत असल्याने संतापलेला गुरुनाथ विंदू समोर येताच चांगलाच भडकला.

गुरुनाथ - विंदूसह चौघांना जामीन- गुरूनाथ मयप्पन, विंदू दारासिंग, अल्पेश पटेल आणि प्रेम तनेजा या चौघांना किल्ला कोर्टाने सोमवारी न्यायालयीन 14 जूनपर्यंत कोठडी सुनावली. यानंतर त्यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर आज सुनावणी झाली व या चौघांना जामीन मंजूर करण्यात आला. या चौघांची प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली. याचबरोबर देशाबाहेर जाण्यास बंदी घातली आहे. मुंबई क्राईम ब्रॅचच्या कार्यालयात दिवसाआड भेट देण्यास सांगितले आहे. मात्र या चौघांनी सोमवारची रात्र आर्थर रोड कारागृहात काढली.

केशू पुणेला ६ जूनपर्यंत कोठडी- किशोर पबलानी ऊर्फ केशू पुणे याला मुंबई क्राइम ब्रॅन्चच्या अधिकार्‍यांनी सोमवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. दुबईहून मुंबईत परतल्यावर पुणे याला विमानतळावरच पोलिसांनी ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.