आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्याच सेकंदात ६ लाख लोकांच्या उड्या, फ्रीडम-२५१ ची वेबसाइट क्रॅश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 'फ्रीडम २५१' खरेदी करण्यासाठी पहिल्याच सेकंदात सहा लाखांहून अधिक लोकांनी कंपनीच्या वेबसाइटवर उड्या पडल्या. सर्व्हर ओव्हरलोड झाला आणि काही सेकंदांत साइट ठप्प झाली. बुकिंगसाठी सकाळ ६.०० वाजण्याआधी उठलेल्या ग्राहकांचा अपेक्षाभंग झाला. पे-नाऊवर जाताच तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. अखेर अडचणी वाढल्यानंतर रिंगिंग बेल्स कंपनीने बुकिंग २४ तासांसाठी बंद केले.
बुकिंग आता शुक्रवारी सकाळी सहापासून सुरू होऊन २१ फेब्रुवारीला सायंकाळी ८.०० पर्यंत राहील. रिंगिंग बेल्स कंपनीने वेबसाइटवर लिहिले की, आपला असामान्य प्रतिसाद आणि आतापर्यंत मिळालेल्या सहकार्याबद्दल आभारी आहोत. आम्हाला दर सेकंदाला सहा लाख हिट्स मिळत आहेत. यामुळे सर्व्हर ओव्हरलोड झाले आहे. आम्ही आमची सेवा स्थगित करून अपग्रेड करत आहोत. आम्ही २४ तासांत तुम्हाला उत्तर देऊ.

मोबाइलची किंमत लोकांना खटकत आहे. याला घोटाळा संबोधले जात आहे. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्यासह इंडियन सेल्युलर असोसिएशनने (आयसीए) फोनच्या किमतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आयसीएच्या म्हणण्यानुसार, फोनच्या ज्या वैशिष्ट्यांचा दावा केला जातो ती ३५०० रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळू शकत नाहीत. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानेही चौकशी सुरू केली आहे.
आयसीएचे म्हणणे असे
>सर्वात स्वस्त कच्चा माल मिळाल्यास एक मोबाइल तयार करण्यास कमीत कमी २७०० रुपये खर्च येईल.
>शुल्क, कर, ठोक व किरकोळ वितरकाचा नफा मिळून किंमत कमीत कमी ४१०० रुपये होईल.
>आता बुकिंग करून चार महिन्यांत फोन देऊ. मात्र कसे? अजून कारखाना अस्तित्वात नाही.

पुढील स्लाइड वाचा, रिंगिंग बेल्सचा दावा : होय, शक्यच