आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bookis Tells How Betting Market Decides Rates For Politicians

सट्टेबाजाने सांगितले, कसे ठरतात नेत्यांचे रेट आणि कसा लावला जातो सट्टा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक एक्झिट पोलने आम आदमी पार्टी बहुमताचे सरकार स्थापन करणार असा अंदाज वर्तवला आहे. या निवडणुकीत सट्टा बाजारदेखील एक्झिट पोलच्या बाजूनेच असल्याचे दिसत आहे. सट्टेबाजांनी आपचे अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात दिल्लीत सरकार स्थापन होण्याचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, सट्टा बाजारात कोणावर कसा विश्वास दाखविला जातो आणि हा सट्टा बाजार नेमका कसा चावला जातो हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
काही सट्टेबाजांशी बातचीत केल्यानंतर त्यांनी या बाजारात नेत्यांचे रेट कसे ठरतात, याला कोण ऑपरेट करते हे सांगितले आहे.
दिल्ली निवडणुकीत कोणता राजकीय पक्ष सट्टे बाजारात आघाडीवर आहे?
सट्टेबाज - सुरुवातीला भाजप आघाडीवर होती, नंतर किरण बेदी यांना त्यांनी पुढे केल्यानंतर जे सर्वे आले त्यात आम आदमी पार्टी वेगाने पुढे आल्याचे दिसून आले. मात्र, दोन्ही पक्षांमधील अंतर हे चार ते पाच जागांपेक्षा जास्त नसेल असे वातावरण होते.
कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील?
सट्टेबाज - आमच्या आंदाजाने आम आदमी पार्टीला 34 ते 36 जागा मिळत आहेत. भाजपला 31 ते 32 तर काँग्रेसला दोन ते पाच जागा मिळाल्या तरी खूप झाल्या.
दोन दिवसांपूर्वी सट्टे बाजाराचा अंदाज भाजपच्या बाजूने होता, मग अचानक आपने आघाडी कशी घेतली?
सट्टेबाज - भाजपन किरण बेदींना मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केल्यानंतर वातावरण बदलले.
कोणताही पक्ष जिंकला तर त्याची कारणे काय असतील? तुम्ही लोक कोणत्या आधारावर हा बाजार ठरविता?
सट्टेबाज - आधार खूप असतात. काही जागांवर कोण विजयी होणार हे ठरलेले असते. आप आणि भाजप यांच्यात काट्याची लढत आहे. काहीही होऊ शकते. सट्टा बाजार हा एका-एका जागेसाठी लावला जातो. लोकांशी चर्चा करुन हे ठरविले जाते. काय होऊ शकते याचा अंदाज असतो, अशा सर्व गोष्टींवरुन हे ठरविले जाते.
सध्या सट्टे बाजारात का भाव सुरु आहे?
सट्टेबाज - प्रत्येक जागेचे वेगवेगळे दर ठरलेले आहे. आमचे रेट हे पक्षावर नाही तर जागेवर ठरतात. पक्षापेक्षाही उमेदवार कोण आहे यावरुन रेट ठरतो.
जे लोक सट्टेबाजार चालवितात त्यांच्या आवडीचे उमेदवार कोणते आहेत?
सट्टेबाज - उदाहरणार्थ सांगायचे झाल्यास, जनकपुरीमधून मुखीजी (जगदीश मुखी) आहेत.
किरण बेदी या तुमच्या पसंतीच्या उमेदवार नाहीत का?
सट्टेबाज - नाही, नाही. आमच्या तर त्या आवडीच्या नाहीत. कन्फर्म जागा ही आमच्या पसंतीची नसते. किरण बेदी यांची जागा ही सुरक्षीत जागा समजली जाते.
तुमच्या पसंतीच्या उमेदवारांचे रेट आधीच ठरलेले होते का?
सट्टेबाज - आधीच सांगितल्यानुसार प्रत्येक जागेचे रेट वेगवेगळे असतात. हे वेगवेगळ्या टीम ठरवितात. जसे आता सट्टेबाजार 2-20 चालू आहे. आम आदमी पार्टीवर लोक जास्त पैसे लावत आहेत.
राजकीय लोक तुम्हाला अंदाज विचारतात का?
सट्टेबाज - नाही हो. आमचा आणि त्यांचा काही संबंध नसतो.
सट्टे बाजारातून नफा कसा मिळतो?
सट्टेबाज - समजा मुखीजींची जागा आहे. लोक काँग्रेसवर पैसे लावू लागले. तिथे भाजप उमेदवारावर कमी भाव असतो. उदाहरणार्थ आम्ही वीस रुपयांवर तीन रुपये देत असू तर एका व्यक्तीला वीस रुपयांवर तीन रुपयांचा फायदा होतो. दुसरीकडे आप आणि काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांना अधिक भाव असतो. अशाच पद्धतीने ज्या उमेदवाराची जास्त हवा असते त्याचा भाव कमी केला जातो.
लोक तुमच्यावर विश्वास कसा ठेवतात. समजा किरण बेदींचा भाव एक रुपयाला तीस पैसे आहे. तर यावर विश्वास कसा ठेवला जातो?
सट्टेबाज - यात आम्ही आमच्याच लोकांना सहभागी करुन घेतो. त्यांच्याच माध्यमातून पैसे लावले जातात.